👁 8 Views

पंढरपुरात दि.२३,२४ व २५ फेब्रुवारी रोजी ‘ट्रेडएक्स्पो २०१९’ चे आयोजन… स्वेरीच्या एम.बी.ए. विभागाचा तीन दिवसांचा उपक्रम

पंढरपूर LIVE 8 फेब्रुवारी 2019

पंढरपूर- येत्या दि. २३,२४ व २५ फेब्रुवारी २०१९ रोजी पंढरपुरातील टिळक स्मारक मैदानावर सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत ट्रेडएक्स्पो २०१९’ च्या माध्यमातून भव्य कृषी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूरचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
एम.बी.ए. शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना स्थानिक बाजारपेठेपासून ते जागतिक बाजारपेठेपर्यंतचे सखोल ज्ञान तसेच, कार्पोरेट उद्योगांना लागणारे मनुष्यबळ, उद्योग सुरु करण्यासाठी व पुढे यशस्वीरीत्या चालू ठेवण्यासाठी लागणारा पैसा यांचे सखोल ज्ञान मिळविण्याच्या उदात्त हेतूने ट्रेडएक्स्पो २०१९’ च्या माध्यमातून कृषी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन स्वेरी संचलित एम.बी.ए. विभागाने केले आहे. या मेळाव्यातून विक्रेते व ग्राहक यांच्याशी सुसंवाद होवून आवश्यक व्यवहार होतील. सोलापूर जिल्यातील नागरिकांसाठी हा मेळावा म्हणजे चालून आलेली सुवर्ण संधीच आहे. या मेळाव्यातून ग्राहकांना कमी दरात वस्तू खरेदी करता येणार असून सर्व गरजू वस्तू एकाच ठिकाणी मिळणार आहेत. यामध्ये सहभागी कंपनी, विक्रते आपल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री करणार आहे. यापूर्वी असा मेळावा महाविद्यालय परिसरात व याच ठिकाणी (टिळक स्मारक मैदान, स्टेशन रोड, पंढरपूर) आयोजन केले होते. याला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता पंढरपूर पंचक्रोशीतील नागरिकांच्या पंढरपूर शहरात असे भव्य आणि दिव्य ग्राहक मेळाव्याचे आयोजन वेळोवेळी व्हावे.’ अशी मागणी केली होती. त्यानुसार याचे ३ दिवस पंढरपुरातील स्टेशन रोड लगत असणार्‍या टिळक स्मारक मैदानावर सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत याचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे. 

यामध्ये आकर्षक व सवलतीच्या दरात शेतीविषयक अवजारे व उत्पादने, टू व्हीलरफोर व्हीलरइलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल वस्तू व साहित्यरेडीमेड कपडेट्रॅक्टरठिबक सिंचनविमा योजनागृहोपयोगी वस्तू, पुस्तकेमोबाईल व त्याचे साहित्य तसेच इतर गरजेचे साहित्य या ट्रेडएक्स्पो २०१९’ प्रदर्शन व विक्री योजनेत असणार आहेत. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेडएक्स्पो २०१९’ या उपक्रमाचे आयोजन स्वेरी संचलित एम.बी.ए विभागाने केले असून एम.बी.ए विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील व इतर प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी समन्वयक संकेत हळणवर व वैभव साळुंखे  यांच्यासह एम.बी.ए. विभागातील सर्व विद्यार्थी ट्रेडएक्स्पो २०१९च्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या आयोजनामुळे पंढरपूरकरांना खरेदी करण्यासाठी एक मेजवानीच मिळणार असून ट्रेडएक्स्पो २०१९’ मेळावा संदर्भातील अधिक माहितीसाठी संकेत हळणवर (मोबा.नं.-९५२७६७०१४७) व वैभव साळुंखे (मोबा.नं.- ८८३०७६००३०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *