पंढरपूर LIVE 8 फेब्रुवारी 2019
पंढरपूर: “स्वराज्य आले यौवनात, सुराज्य निर्माण होणार कधी” कर्मवीर आणि शिवराय यांची आपल्या कार्यावर जशी उदंड निष्ठा होती, तशी प्रत्येकाची आपल्या कार्यावर असायला हवी. आपण समाजाचे देणे लागतो ही जाणीव प्रत्येक व्यक्तीमध्ये असायला हवी. आजच्या पिढीने मोबाईलच्या वेडातून बाहेर येऊन
आपली संस्कृती जपने आवश्यक आहेलोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्यबरोबर लोकशाहीच्या तत्वांचे भान ठेवले पाहिजे. शिवरायांच्या स्वराज्य उभारणीमध्ये सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र होते हा विचार आजच्या पिढीने स्वीकारला पाहिजे. आई-वडील आणि शिक्षकांनी सांगितलेल्या विचारांचे आचरण करावे.’ असे विचार
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारलेले कलाकार शंतनू मोघे यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विद्यार्थ्याच्या प्रश्नावर उत्तर देताना मोघे म्हणाले, ‘भगवा रंग त्यागाचे प्रतिक आहे. त्याचे पावित्र्य जपले पाहिजे, स्वराज्यावर शिवरायांची पराकोटीची श्रध्दा होती. रायगडावर कालच्या पुण्याईच्या बळावर आजचा दिवस उगवत नाही. त्यासाठी कष्ट करावे लागतात हा शिवरायांचा मानदंड होता. विद्यार्थ्यांनी कष्ट
करून जीवनामध्ये यश संपादन केले पाहिजे. मालिकेच्या आठवणी सांगताना पन्हाळगडावर झालेली शिव-शंभू भेट हा भावलेला प्रसंग म्हणून उल्लेख केला. शिवरायांनी भावना म्यान केल्या म्हणून स्वराज्य निर्माण झाले.’
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले ,’ शिवरायांनी मानवाला मानवता दिली. समाजाला स्त्री सन्मान शिकविला. खण आणि फण यासाठी भांडणे होणार नाहीत याचा आदर्श शिवरायांनी घालून दिला आहे. कर्मवीर अण्णांनी रयतेचा लावलेल्या वटवृक्षामुळेच आपण सर्वजन आहोत’ यावेळी व्यासपीठावर मा. बाळासाहेब पाटील ( वरवडे), मा. बाळासाहेब पाटील ( रोपळे ) जिमखाना विभाग प्रमुख प्रा. डॉ. नितीन सोहनी, प्रा. व्ही. बी. फुले, वसंतनाना देशमुख, मा. अमरजित पाटील, डॉ. राजेंद्र जाधव, प्रा. जयंत भंडारी, उपप्राचार्य प्रा. बी. जे. तोडकरी, प्रा. एन. एन. तंटक, डॉ. एस. एस. माने, डॉ. विकास कदम, रजिस्टार श्री. अनंता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
स्वागत, प्रास्ताविक व पाहुण्यानांचा परिचय डॉ. विकास कदम यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरूवात सांस्कृतिक विभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने झाली. यावेळी डॉ. नितीन सोहनी यांनी जिमखाना अहवालाचे वाचन केले. अखिल भारतीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्ध्येत बेचाळीस
खेळांडू सहभागी झाले व महाराष्ट्र राज्य क्रीडा महोत्सवात सतरा खेळाडूची निवड झाली. तसेच सांस्कृतिक, राष्टीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागातील विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. बी. बी. शितोळे यांनी गुणवंत शिक्षक सत्काराचे वाचन केले. मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयातील आविष्कार, व्हेन्चर, आर्थिक जगत, अर्थमंच, युरेका या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या आनंद सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, सेवक यांचा सत्कार करण्यात आला. पंढरपूर परिसरातील नागरिक, शिक्षक, सेवक, विद्यार्थी, पालक, रयतप्रेमी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे, प्रा. आर. एस. पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रा. व्ही. बी. फुले मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com