👁 7 Views

भारत बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या बळावर जगावर राज्य करेल – डॉ. मृणालिनी फडणवीस

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019

पंढरपूर: ‘भारतातील विद्यार्थ्यामध्ये बुद्धिमत्ता जास्त आहे. त्याच बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत जगावर राज्य करणार आहे. सध्याचे शिक्षक विद्यार्थी यांच्या रेशोचे प्रमाण हे एकशेवीस आहे हे प्रमाण खूपच जास्त
आहे, ते कमी करून साठ करण्याची आवश्यकता आहे, तरच शिक्षक विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकतील. प्रत्येक महाविद्यालयामध्ये एक चांगला गुण असतो याचा विचार करून सर्व महाविद्यालयांना रुसाने अनुदान
देण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कौशल्यावर आधारित ज्ञान देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यामध्ये ज्ञानाची भूक जास्त आहे पण तो फक्त परीक्षार्थी झाला आहे. आरोग्य आणि शिक्षण हीच
देशाची सर्वात मोठी गुंतवणूक आहे.’ असे विचार सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 
आयोजित महाराष्ट्र राज्य अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य महासंघाच्या ३८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात बोलत होत्या.

         
या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून मनोगत व्यक्त करताना शिक्षक आमदार विक्रम काळे म्हणाले की, ‘आज महाविद्यालयातील विद्यार्थ्याची वर्गातील उपस्थिती कमी झाली आहे. भविष्यकाळात विद्यार्थ्याची
शिष्यवृती ही त्याच्या वर्गातील उपस्थितीवर अवलंबून असावी. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना शासकीय अनुदानाची गरज आहे. शिक्षणातील गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी सर्वस्वी आपली आहे.’ शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत मनोगतात म्हणाले की, ‘देशाच्या शिक्षणाची घडी बिघडत चालली आहे ती व्यवस्थित करण्यासाठी प्राथमिक शिक्षणापासून प्रयत्न करायला हवे.’

महाराष्ट्र राज्यच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने म्हणाले की, ‘ कर्मवीर
अण्णांनी दीन दलितांसाठी शिक्षणाची दारे खुली करून प्राथमिकपासून आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत शिक्षण देऊन देशापुढे आदर्श ठेवला आहे. पारंपरिक शिक्षणापेक्षा काळानुरूप कौशल्यावर आधारित शिक्षण देणे
आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे.’
या अधिवेशनाचा प्रारंभ पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने झाला. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे होते. प्राचार्य डॉ. नंदकुमार निकम व प्राचार्य
भाऊसाहेब जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. विजयसिंह सावंत, अध्यक्षा पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते पाटील, रुसा सहसचिव डॉ. विजय जोशी, डॉ. आबासाहेब देशमुख, डॉ. एस. टी. गडदे, डॉ. डी. बी. जाधव, डॉ. दिलीप गोतमारे, डॉ. क्रांतीकुमार पाटील, डॉ. बी. यु. जाधव, डॉ. आर. एम. सदन, डॉ. एन. एस. कोकोडे, डॉ. आर. एस. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्यवरांचे स्वागत डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले. डॉ. चंद्रकांत कोळेकर, डॉ. राजेंद्र शेंडगे, डॉ. भीमाशंकर भांजे, डॉ. साहेबराव जुंधळे, डॉ. जे.जी. जाधव, डॉ. डी. जी. साळुंखे तसेच महाराष्ट्रातील वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अमर कांबळे, प्रा. आर. एस. पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आभार डॉ. सुधाकर जाधवर यांनी मानले. उदघाटन समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *