👁 7 Views

स्वेरीमध्ये एम.एच.टी.-सी.ई.टी २०१९ ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सोय ! प्रक्रीया २३ मार्च २०१८ पर्यंत चालणार

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019

पंढरपूरः- (संतोष हलकुडे) बारावी परिक्षेनंतर विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीफार्मसी व वैद्यकीय विभागात प्रवेश कसा मिळेल ? याचे वेध लागते आणि यासाठी जणू ही एक स्पर्धाच सुरु होते. शासनाने एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ च्या ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याच्या तारखा निश्चित केल्या असून ०१ जानेवारी २०१९ पासून ते २३ मार्च २०१९  पर्यंतच्या कालावधीत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. ज्यांना अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये प्रवेश घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांची सोय व्हावी व फॉर्म भरताना होणार्‍या चुका टाळाव्यात या हेतूने श्री. विठ्ठल अभियांत्रिकीच्या वतीने महाविद्यालयामध्येच दि.९ फेब्रुवारी २०१९ पासून ते दि.२३ मार्च २०१९ पर्यंत सकाळी ९ पासून ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मोफत रजिस्ट्रेशन करण्याची सोय केली आहे.’ अशी माहिती श्री.विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

       
अभियांत्रिकी व फार्मसीमध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९  परीक्षेचे रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांची उडणारी धांदल व होणार्‍या चुका टाळण्यासाठी या उच्चशिक्षीत प्राद्यापकांमार्फत मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी घेतला. राज्य शासनाची एम.एच.टी.-सी.ई.टी.२०१९ ही परीक्षा दि.२ मे ते दि.१३ मे २०१९ दरम्यान होणार असून या श्री. विठ्ठल अभियांत्रिकीच्या मोफत ऑनलाईन रजिस्टेशनच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आता निश्चिंत राहून अचूक फार्म भरता येणार आहेत.

एम.एच.टी.-सी.ई.टी. २०१९ ही परीक्षेसाठी खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठी रु.८००/- तर मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी रु. ६००/-  शासकीय परीक्षा फी असणार आहे. यासुवर्ण संधीचा लाभ बारावी (सायन्स) परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या एम.एच.टी.सी.ई.टी २०१९चे रजिस्टेशन ते परीक्षा प्रक्रीयेबाबतच्या अधिक माहितीसाठी प्रा. यु.एल. अनुसे (मोबा. ९१६८६५५३६५), प्रा. ए.एच. कलुबर्मे (मोबा. ९१६८६५५३६५)  व टोल फ्री क्र. १८०० ३००० ४१३१ यावर संपर्क साधावा असे आवाहन अभियांत्रिकी (पदवी ) प्रवेश प्रक्रीयेचे अधिष्ठाता डॉ. पी.एस. कचरे यांनी केले आहे.  


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *