👁 11 Views

प्रभाग क्रमांक 14 मधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न अखेर सुटला…. 66 लाख 36 हजार रुपयांचा निधी मंजुर- नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट

पंढरपूर LIVE 12 फेब्रुवारी 2019

पंढरपूर (प्रतिनिधी):- गेल्या अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न प्रलंबीत होता. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सातत्याने आ.प्रशांतराव परिचारक व पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा पाठपुरावा सुरु होता. अखेर आमच्या पाठपुराव्याला यश आले असून या भागातील नवीन पाईपलाईनच्या कामासाठी 66 लाख 36 हजार 270 रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लवकरच या कामास सुरुवात होईल आणि नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटेल. अशी माहिती पंढरपूर नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ. अर्चना नवनाथ रानगट यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.  
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर अनुदानातून प्रभाग क्रमांक 14 मधील वांगीकर नगर तलाव भागात नवीन डि.आय. पाईपलाईन वितरण व्यवस्था टाकणसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.  प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाण्याची टाकी असुनही पाईपलाईन नसल्यामुळे प्रशांतराव परिचारक नगर, सावरकर नगर, वसंत नगर, वांगीकर नगर, मंगळवेढेकर नगर, स्वामी समर्थ नगर, बालाजी नगर आदी भागातील अनेक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. ज्या कांही नागरिकांना जास्त अंतरावरुन अर्धा इंची लहान पाईप टाकून पाणी मिळत होते ते सुध्दा कमी दाबाने मिळत होते. परिणामी अनेकांना पाणी उपसा करणेसाठी इलेक्ट्रीक मोटारींचा वापर करावा लागत होता.
प्रशांतराव परिचारक नगरमध्ये 2014 मध्ये पिण्याची नवीन टाकी कार्यान्वीत झाली होती. एमजीपीने पाण्याची टाकी बांधली परंतु पाईपलाईनचे काम अधुरे होते. त्यामुळे कांही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असे तर कांही भागात पाणीच पोहचत नसे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटावा ही या भागातील नागरिकांची प्रमुख मागणी होती. त्यादृष्टीने आम्ही सातत्याने हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले, या भागातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्‍न आ.प्रशांतराव परिचारक व नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले यांच्या निदर्शनास आणुन दिला. अखेर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्‍न मार्गी लागला असून पंढरपूर नगरपरिषदेकडून हे काम झाल्यानंतर या वर्षी ऊन्हाळ्याच्या आतच या भागातील नागरिकांना पुरेशा दाबाने पिण्याचे पाणी मिळणार आहे. अशी माहितीही नगरसेविका सौ.अर्चना नवनाथ रानगट यांनी दिली.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *