👁 8 Views

शहीद नितीन राठोड व संजय राजपूत यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचे धनादेश सुपुर्द

पंढरपूर LIVE 17 फेब्रुवारी 2019

मुंबई: जम्मू- कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत शहीद झाले. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या या दोन्ही जवानांवर शनिवारी शासकीय मानवंदनेसह अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान, शहीद जवानांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या 50 लाख रूपये मदतीचे चेक (धनादेश) सुपुर्द करण्यात आले.
 


शहिद जवान संजय राजपूत यांच्या पार्थिवास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. तर राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवास शासकीय मानवंदनेसह आदरांजली अर्पण केली.
लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांड्यावर मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवास शासकीय मानवंदनेसह आदरांजली अर्पण केली. यावेळी मंत्री निलंगेकर-पाटील यांनी राठोड कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांच्याकडे राज्य शासनाच्या मदतीचा 50 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. तर, केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर यांनी शहीद जवान संजय राजपूत यांच्या कुटूंबियांकडे 50 लाख रूपये मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करीत शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली होती. शहीद झालेल्या राज्यातील जवानांच्या कुटुंबियांना 50 लाखांची मदत करून कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार शहिदांच्या कुटुंबियांकडे 50 लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

मलकापूर येथे शहीद संजय राजपूत यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, गृह राज्यमंत्री डॉ रणजित पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, मध्यप्रदेशातील खंडवा येथील खासदार नंदकुमार चव्हाण, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार ॲड आकाश फुंडकर, आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.


महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 36 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

-: कार्यालय :-

शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *