👁 7 Views

छत्रपती शिवराय व संत रोहिदास महाराज यांची जयंती पंढरीत साजरी

Pandharpur LIVE 20 February 2019

पंढरपूर (प्रतिनिधी):- येथील श्री संत रोहिदास चौक तरुण मंडळ यांच्‍यावतीने राष्ट्रसंत शिरोमणी संत रोहिदास महाराज तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती दि.19 फेब्रुवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ अवताडे यांनी भेट देऊन सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

सायंकाळची प्रतिमेचे पूजन पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या हस्ते व युवक नेते प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी पुलवामा येथे अचानक झालेल्या हल्ल्यात आर्मीचे 42 जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली व गरजू व समाजातील गरीब मुलांना वर्षभराचे शालेय साहित्य देण्यात आले. यावेळी माजी समाजकल्याण जि.प. सभापती सुरेश आगावणे, नगरसेवक सुजीतकुमार सर्वगोड,इस्माईल बोहरी, मालोजी शेंबडे,आबासाहेब आगावणे, दिगंबर पवार,सुभाष पाटील, कृष्णा वाघमारे,संजय कांबळे,दाजी शिंदे,राजेंद्र शिंदे, सतीश कांबळे,नितीन कांबळे, राजेश आगावणे, शैलेश आगावणे,तुषार खडतरे,नवनाथ कांबळे,आकाश वाघमारे,निलेश आगावणे,सुनील वाघमारे,अजय वाघमारे,बालाजी बनसोडे,महेश वाघमारे,शुभम वाघमारे, नीलेश वाघमारे,तिरुपती गवळी, अविनाश वाघमारे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *