Pandharpur LIVE 22 February 2019
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
या मेळाव्यामध्ये एकाच मांडवाखाली सर्व वस्तू मिळणार आहेत. यापूर्वी ‘ट्रेड एक्स्पो’ हा ग्राहकांसाठीचा मेळावा गोपाळपुरच्या माळरानावर अर्थात महाविद्यालयाच्या प्रांगणातच घेण्यात येत होता पण ग्राहक व विक्रेते यांना वाहतुकीसाठी पंढरपूर शहरापासून जवळपास चार किलोमीटर अंतर पायपीट करावे लागत होते. यासाठी हा मेळावा पंढरपूर शहरात भरविण्यासाठी स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्याकडे आग्रही भूमिका घेतली. गेल्या वर्षी टिळक स्मारक मैदानात हा ग्राहक मेळावा आयोजित केला होता.त्या तीन दिवसात जवळपास पंढरपूर शहराबरोबरच शेजारच्या जिल्ह्यातील नागरिकांनी देखील याचा लाभ घेतला होता. याच पार्श्वभूमीवर यंदादेखील याच ठिकाणी ‘ट्रेड एक्स्पो २०१९’.मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानुसार आज (शनिवार) पासून तीन दिवस हा ग्राहक मेळाव्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. यामध्ये आकर्षक व सवलतीच्या दरात शेतीविषयक अवजारे व उत्पादने, टू व्हीलर, फोर व्हीलर, इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल वस्तू व साहित्य, रेडीमेड कपडे, ट्रॅक्टर, ठिबक सिंचन, विमा योजना, गृहोपयोगी वस्तू, पुस्तके, मोबाईल व त्याचे साहित्य तसेच इतर गरजेचे साहित्य या‘ट्रेडएक्स्पो २०१९’ प्रदर्शन व विक्री योजनेत असणार आहेत. सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ट्रेडएक्स्पो २०१९’ या उपक्रमाचे आयोजन स्वेरी संचलित एम.बी.ए विभागाने केले असून एम.बी.ए विभागाचे प्रमुख प्रा. करण पाटील व इतर प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी समन्वयक संकेत हळणवर व वैभव साळुंखे यांच्यासह एम.बी.ए. विभागातील सर्व विद्यार्थी ‘ट्रेडएक्स्पो २०१९’च्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत. या आयोजनामुळे पंढरपूरकरांना खरेदी करण्यासाठी एक मेजवानीच मिळणार आहे.

