👁 12 Views

विजयकुमार गायकवाड यांची अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या पंढरपूर अध्यक्षपदी निवड

Pandharpur LIVE 22 February 2019

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये पोहरगाव (सोलापूर) येथील विजयकुमार गायकवाड  यांची पंढरपूर अध्यक्ष (सोलापूर) पदी निवड करण्यात आली.
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेची बैठक दि. 22/02/2019 रोजी येथे संपन्न झाली यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी*  यांच्या आदेशाने प्रदेश अध्यक्ष अहेमद अन्सारी यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तीपत्र देण्यात आले.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.https://play.google.com/store/apps/details…➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

महाराष्ट्रात  माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पत्रकार व माहिती अधीकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन  कार्यकर्त्यांचे संगठन तयार करून भ्रष्ट नोकरशाही चा माहितीअधिकार कायद्याचा* वापर करून पर्दाफाश करणार आहे. सामाजीक, शैक्षणिक, सांसक्रतीक, वैद्यकिय क्षेत्रात, सरकारी कामात भ्रष्टाचार* होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन *उपोषण, अंदोलन करू अशी माहीती संस्थापक अध्यक्ष यांनी दिली. या निवडी बद्दल यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *