Pandharpur LIVE 22 February 2019
● मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागाचा पालक मेळावा उत्साहात
पंढरपूर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व चांगल्या प्रकारे कमी खर्चात शिक्षण देणारी संस्था म्हणजे सिंहगड ची ओळख निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंहगड कॉलेजमधील सर्व शिक्षक हे मेहनत घेत आहेत त्यामुळेच माझा मुलगा आता चांगल्या कंपनीत नोकरी मिळू शकला आणि त्याला त्या कंपनीत चांगले पॅकेज मिळाले असल्याचे पालक डोंबे म्हणाले. पालक प्रतिनिधी जैनुद्दीन मुलाणी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षण देणारी संस्था म्हणजे पंढरपूर सिंहगड असून या सिंहगड शैक्षणिक संस्थेतील प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या सह सर्वच कर्मचारी अगदी प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेत आहेत अगदी अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने चांगली गुणवत्ता व चांगले विद्यार्थी घडवले असल्याचे मत मुलाणी यांनी व्यक्त केले.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
https://play.google.com/store/apps/details…
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165
कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर
Mail- livepandharpur@gmail.com
कोर्टी (तालुका पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचा पालक मेळावा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. हा पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, असल्याची माहिती महाविद्यालयाचे डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या पालक मेळाव्याचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे पालक प्रतिनिधी राजकुमार डोंबे, डाॅ. रविंद्र व्यवहारे, पत्रकार जैनुद्दीन मुलाणी, प्रा. अमित भादुले आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालक प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला यानंतर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथम सत्र परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. रविंद्र व्यवहारे म्हणाले, पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे ज्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करायचे आहे त्या क्षेत्रातील अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यासाठी वेळ दिला पाहिजे. चांगले गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी ही तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रत्येक स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत व्यवहारे यांनी व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. स्वानंद कुलकर्णी व प्रा. समिर कटेकर यांनी एलसीडी स्क्रीन द्वारे महाविद्यालयात असलेल्या विविध सेवा- सुविधांची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश जोशी यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. अमित भादुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी पालकांनी विचारलेल्या प्रश्नांना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी उत्तरे दिली. उपस्थित पालकांनी व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

