👁 10 Views

पुणे-इंदौर महामार्गावर भीषण अपघात… 4 ठार, 1 जखमी

Pandharpur LIVE 24 February 2019


पुणे-इंदौर महामार्गावर मनमाड इथं कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून एक प्रवासी जखमी झाला आहे.

मनमाडजवळ चोंडी घाटात ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरश: चुराडा झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. जखमी प्रवाशाला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.

 https://play.google.com/store/apps/details…

➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 


अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. 

 गेल्या काही दिवसांपासून या पुणे-इंदौर महामार्गावर अपघातांची मालिका सुरू असल्याचं चित्र आहे. हा महामार्ग मृत्यूचा सापळा झालाय की काय, असा सवालही आता उपस्थित करण्यात येत आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *