👁 11 Views

शिवचरित्र डोक्यात उतरायला हवे – प्रा.गुरुराज इनामदार

Pandharpur LIVE 28 February 2019

शिवजयंती उत्सव 2019 निमित्त मौजे नराळे ता सांगोला येथे शिवव्याख्याते ह भ प प्रा गुरुराज इनामदार यांचे व्याख्यान संपन्न
शिवजयंतीची चाहूल लागली आणि शिवचरित्र ऐकले की आपल्या धमन्यामधील रक्त जणू सळसळ करू लागते पण कालांतराने लगेच शांत होते याचे कारण म्हणजे शिवचरित्र हे आपल्या डोक्यावरुनच निघून जाते जोपर्यंत ते डोक्यात उतरत नाही तोपर्यंत शिवजयंती उत्सव सार्थकी लागणार नाही असे प्रतिपादन प्रा गुरुराज इनामदार यांनी व्यक्त केले.
मौजे नराळे ता सांगोला येथे यावर्षीपासून डीजे व मिरवणुक कार्यक्रमाचा खर्च न करता छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे एक आदर्श काम सर्व गावकर्‍यांनी घेतले आहे त्याची सुरुवात प्रा गुरुराज इनामदार यांच्या व्याख्यानाने झाली.
या शिवजयंती कार्यक्रमात सर्व गावकर्‍यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला त्यामुळे संपूर्ण पंचक्रोशीत या उपक्रमाचे कौतुक होत आहे.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *