👁 10 Views

रिपाईचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र बनसोडे यांचा सत्कार

Pandharpur LIVE 5 March 2019



पंढरपूर (प्रतिनिधी):- रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (ए) च्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल नुकताच त्यांचा सत्कार करण्यात आला. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प.महाराष्ट्राचे सचिव अप्पासाहेब जाधव हे होते. यावेळी नुतन युवा जिल्हाध्यक्ष सचिन भोसले यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना जितेंद्र बनसोडे म्हणाले की, ‘राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी सोपविलेली जबाबदारी व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी व्यक्त केलेला विश्‍वास या दोन्ही बाबी घेवुन मी जबाबदारीने काम करणार असुन सर्व समुहाला बरोबरीने नेण्याचा माझा प्रयत्न राहीन. आपणा सर्वांच्या ॠणात राहणे मी पसंत करीन.


📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com 

याप्रसंगी नगरसेवक महादेव भालेराव, डीएसएसचे प्रदेशाध्यक्ष दिलीपराव देवकुळे, पत्रकार अभिराज उबाळे, रिपाई शहराध्यक्ष संतोष पवार, तालुकाध्यक्ष अर्जुन मागाडे, रिपाईचे प.महाराष्ट्र संघटक बाळासाहेब कसबे, दयानंद बाबर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी युवा आघाडीचे शहराध्यक्ष संतोष सर्वगोड, तालुकाध्यक्ष विजय वाघमारे, पत्रकार सचिन कांबळे, विनायक मागाडे, पोपट क्षिरसागर, मुकूंद मागाडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अर्जुन मागाडे यांनी केले तर सुत्रसंचलन समाधान लोखंडे यांनी केले. आभार संतोष गाडे यांनी मानले. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *