Pandharpur LIVE 12 March 2019
माढा-बुलढाणा आणि वर्धा या तीन जागा द्या अन्यथा काँग्रेस आघाडी विरोधात १५ जागांवर आम्ही उमेदवार देऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी दिला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक झाली. या बैठकीनंतर शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शेट्टी म्हणाले, आघाडीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी माढा, बुलडाणा, वर्धा या जागा सोडाव्यात, हातकंणगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आहे. जी जागा आमचीच आहे ती देण्याचा प्रश्नच नाही असे शेट्टी यांनी सांगितले.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
शेतकरी न्याय्य हक्कांसाठी आवाज उठवतो म्हणून मोदी, फडणवीस यांच्यासह अनेक सत्ताधारी माझ्यावर नाराज आहेत मात्र लढाई मी लढणार आहे त्यामुळे माझ्यासमोर कोणीही निवडणूक लढवली तरी हरकत नाही, मी हातकंणगले मतदारसंघातून पुन्हा निवडून येईन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीकडून अनेक प्रस्ताव आले मात्र वर्धा, बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी आम्ही आग्रही आहोत. बुलडाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर, वर्धा मतदारसंघातून माजी मंत्री सुबोध मोहिते हे निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आघाडीने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करावा अन्यथा राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून पंधरा जागांवर उमेदवार उभे केले जातील, असा इशारा शेट्टी यांनी दिला.



