Pandharpur LIVE 15 March 2019
दि.17 मार्च जागतिक अपंग दिनानिमित्त मातोश्री मिनाताई ठाकरे प्रतिष्ठान व धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान पंढरपूर यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व अपंग बांधवांचा भव्य सन्मान सोहळा रविवार दि.17 मार्च 2019 सकाळी 9.30 वाजता खांदेश भक्त निवास संत पेठ सांगोला रोड पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
📲पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन.
➡️पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूरMail- livepandharpur@gmail.com
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना माजी जिल्हाप्रमुख साईनाथ भाऊ अभंगराव, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिल दादा सावंत, बालरोग तज्ञ डॉ.शितल शहा, डॉ.प्रशांत निकम, शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैलाताई गोडसे, राजश्रीताई लोंढे, जोशाबा टाईर्म्सचे संपादक श्रीकांत कसबे, प्रहार अपंग क्रांती संघटना महिला जिल्हाध्यक्ष संजीवनी बारंगुळे, जिल्हा सचिव संजय जगताप,हॅंडीकॅप असोसिएशन संस्थापक सचिव कु.मिनाक्षी देशपांडे आदि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा साजरा होणार आहे.
तरी या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व अपंग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या हक्काचा सन्मान स्विकारावा असे आवाहन संस्थापक संजय दशरथ घोडके यांनी केले आहे.



