👁 11 Views

पंढरीतील सचिन शिंदे या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी एकास अटक

Pandharpur LIVE 24 March 2019

मयत सचिन शिंदे

पंढरपूर येथील सचिन शिंदे (वय ३१), (रा. घनश्याम सोसायटी, एल.आय.सी. कार्यालयामागे, पंढरपूर) या युवकाच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी काल रात्री एकास अटक केली आहे. सचिन शिंदे यांनी २० मार्च २०१९ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास आपले राहते घरी ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

यासंदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.  तपास अधिकारी पीएसआय डी.एस. निकम यांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवून सचिन शिंदेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिपक माणिक चव्हाण (४९) , (रा. घनश्याम सोसायटी, एल.आय.सी. कार्यालयामागे, पंढरपूर) यास काल रात्री ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपीस आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे समजते.


📲 पंढरपूर लाईव्ह वरील ताज्या बातम्या पहाण्यासाठी खालील लिंकला क्लीक करुन आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, पंढरपूर लाईव्ह चे अँड्रॉईड अॅप्लीकेशन. https://play.google.com/store/apps/details…
➡️ पंढरपूर लाईव्ह वर आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी संपर्क साधा- 7972287368, 7083980165 कार्यालय- शिवयोगी मंगल भवन, कर्मयोगी नगर, लिंक रोड, पंढरपूर Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *