पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये “इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील संधी” या विषयावर मार्गदर्शन प्रसंगी डाॅ. बाडगे यावेळी व्यासपीठावर मान्यवर.
पंढरपूर (प्रतिनिधी) अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या कोर्टी ता. पंढरपूर येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात चतुर्थ वर्षात अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी “इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील संधी” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश जाधव, धनंजय कचाळे, सहदेव केंद्रे या व्याख्यात्यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या वेळी विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मधील इंजिनियर साठी खूप नोकरीच्या संधी उपलब्ध असून सरकारी नोकरी मधील फायदे तसेच सरकारी नोकरीसाठी अभ्यास कसा करावा. नोकरी कशी मिळवावी, सध्या महाराष्ट्रातील मुलांचे सरकारी नोक-यांमध्ये स्थान काय आहे. सरकारी नोकरी मिळण्यासाठी कोणकोणते ज्ञान आवश्यक आहे आणि विविध क्षेत्रात सरकारी नोकरी मध्ये अर्ज कसा करावा. या संदर्भात माहिती यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी जानव्ही पुजारी यांनी केले तर उपस्थितांचेआभार डॉ.राजश्री बाडगे यांनी मानले