माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार प्रशात परिचारक, आमदार नारायण आबा पाटील, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, शिवाजीराव सावंत, शहाजी बापु पाटील, शहाजी पवार, श्रीकांत देशमुख, दादासाहेब साठे, संजय कोकाटे, श्रीकांत बागल, संजय पाटील यांच्यासह भाजप- शिवसेना युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपाचे रणजितसिंह आणि राष्ट्रवादी चे संजयमामा या दोघांची माढ्यातून जोरदार लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने निंबाळकर यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर केली. यानंतर आज त्यांनी लागलीच अर्ज दाखल केला. रणजित निंबाळकर यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याशी होणार आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, माण-खटाव आणि फलटण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. करमाळ्यात शिवसेनेचा, माढ्यात राष्ट्रवादीचा, सांगोल्यात शेकापचा, माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचा, माण-खटावमध्ये काँग्रेसचा तर फलटणमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे माढ्यात यंदा संजयमामा शिंदे आणि रणजित निंबाळकर यांच्यात जोरदार लढत होईल अशी अपेक्षा आहे.
………………………………
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल ३९ लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल ३९ लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com

