पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी ता. पंढरपूर येथील सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद आयोजित करण्यात आली होती ही परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या परिषदेचे उदघाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड इन्स्टिट्युट पुणे येथील संचालिका डाॅ. आशा बोकील, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. रविंद्र व्यवहारे आदी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने परिषदेची सुरवात करण्यात आली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात यांञकी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागा मार्फत दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत शंभर हुन अधिक शोधनिबंध सादर करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणुन सिंहगड पुणे येथील प्रा. आर.एच काटीकर, प्रा. अतुल सागडे, डाॅ. एम. जी. कलवान कल्याणशेट्टी, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. सचिन सोनवणे, डाॅ. चेतन पिसे आदीनी काम पाहिले. या परिषदेचे समन्वयक म्हणून प्रा. बाळासाहेब गंधारे, प्रा. गणेश लकडे सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गुरुराज इनामदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. अजिंक्य गायकवाड यांनी मानले.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड,
पंढरपूर, जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whats Up – 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Mail- livepandharpur@gmail.com

