👁 9 Views

भीमा नदीवरचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत व नदीकाठचा विद्युत पुरवठा पुर्ववत करावा- आमदार भारत भालके

पंढरपूर दि.03 ः सध्या उजनी धरणातून पिण्यासाठी सोलापूर शहरासह भीमा नदीकाठच्या पाणी पुरवठा योजनांसाठी भीमा नदीद्वारे पाणी सोडलेले आहे. नदीवर असणार्‍या बंधार्‍यात एप्रिल ते जून या तीन महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी पूर्ण क्षमतेने भरण्यात यावे. कारण हे चालू सिझनमधील शेवटचेच पाणी असल्याने तसेच सध्या ऊनाची तीव्रता जास्त प्रमाणात जाणवू लागल्याने,  पुरेसा पाऊस न पडल्यामुळे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जनावरांच्या पिण्याच्या व चार्‍याचा प्रश्न प्रचंड प्रमाणात जाणवत असून अगदी अत्यल्प पाण्यावर जोपासलेली उभी पिके पाण्याअभावी करपू लागलेली आहेत. सध्या भीमा नदीला पाणी असूनही नदीकाठचा वीज पुरवठा खंडीत केल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांवर संकट आलेले आहे.
           सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सोडलेल्या पाण्याने पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीवर असलेले सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत असे मा.जिल्हाधिकारी,सोलापूर, भिमा पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांना त्याचप्रमाणे भीमा नदीकाठचा खंडीत केलेला वीज पुरवठा पुर्ववत करणेसाठी एम.एस.ई.बी.चे अधिक्षक अभियंता यांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी सूचना केल्या.
——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 
पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
 इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड,                  पंढरपूर, जि. सोलापूर 413304मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  उपसंपादक – विजयकुमार गायकवाड Whats Up –  8308838111, 7083980165 Mobile- 7972287368Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *