👁 12 Views

पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत स्वेरीच्या फार्मसीचे दोघेजण प्रथम


उस्मानाबाद मध्ये झालेल्या राष्ट्रीय दर्जाच्या पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत
स्वेरीच्या फार्मसीचे दोघेजण प्रथम
पंढरपूर-गोपाळपूर (ता. पंढरपूर)श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीच्या अंतिम वर्षातील अनुराधा देशमुख व ऋतुजा गोंजारी यांनी अलणी (उस्मानाबाद )येथील आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजिलेल्या राष्ट्रीय दर्जाच्या पोस्टर प्रेझेन्टेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. संशोधन क्षेत्रात फार्मसी देखील आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे देशमुख व गोंजारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
           अलणी (उस्मानाबाद )येथील आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आयोजिलेल्या राष्ट्रीय दर्जाच्या पोस्टर प्रेझेन्टेशनमध्ये येथील स्वेरी संचलित बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या अनुराधा सुभाष देशमुख व ऋतुजा पंकज गोंजारी यांनी प्राचार्या डॉ. एस. डी. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपप्राचार्य डॉ. अमित गंगवाल व प्राध्यापक वर्ग यांच्या नेतृत्वाखाली तयार केलेले ‘रोल ऑफ फार्मासिस्ट इन मॅनेजमेंट ऑफ अॅडव्हर्स ड्रग रिएक्शन अँड फार्माकोव्हीजलन्स’ या विषयावरील शोध पोस्टरचे सादरीकरण केले. यावेळी स्वेरी फार्मसीच्या १५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी या  दोघींच्या पोस्टर प्रेझेन्टेशनला पारितोषक मिळाले. हे सादरीकरण तेथील सर्व स्पर्धकांमधून सर्वोकृष्ठ ठरले. त्यामुळे तेथील डॉ वेदप्रकाश पाटील यांच्यासह तेथील प्राध्यापकांनी स्वेरी फार्मसीच्या देशमुख व गोंजारी यांच्या शोध पोस्टरचा गौरव केला. या सादरीकरणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषक देवून गौरव केला. उच्च शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात देखील भरारी घेत असलेल्या स्वेरीच्या फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, संस्थेचे इतर पदाधिकारी, विश्वस्त स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर तिन्ही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अनुराधा देशमुख व ऋतुजा गोंजारी यांचे अभिनंदन केले.

——————————————————-

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर  Live ” 

तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whats Up –  8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *