पंढरपूर (प्रतिनिधी):पंढरपूर येथील ज्येष्ठ लेखक बी.आर भोसले लिखित व थिंकटॅंक पब्लिकेशन्स सोलापूर प्रकाशित ‘पेनाच्या टोकावर’ या वैचारिक ग्रंथाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी पंढरपूर येथील जुन्या बसस्थानकासमोरील हॉटेल विठ्ठल इन येथे सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला असल्याची माहिती ज्येष्ठ लेखक बा.ना. धांडोरे यांनी दिली.
या ग्रंथाचे प्रकाशन ज्येष्ठ कथाकार योगीराज वाघमारे यांच्या हस्ते व डॉ. टी. एस मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक बा.ना धांडोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. वामन जाधव, डॉ. बाळासाहेब मागाडे उपस्थित राहणार आहेत.
पेणाच्या टोकावर या ग्रंथामध्ये भारतीय राज्यघटना, लोकशाही, देशातील असहिष्णुता, मतदारांच्या अधिकारातून वृद्धिंगत होणारे लोकशाही, विविध सामाजिक घटकांचे प्रश्न, राजकारण्यांचा ढोंगीपणा, समाजात ऐक्याची असलेली गरज आदी मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या ग्रंथाला डॉ. सारीपुत्र तुपेरे यांची दीर्घ प्रस्तावना लाभली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
——————————————————-
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल ” पंढरपूर Live ”
तब्बल 39 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, जि. सोलापूर 413304