पंढरपूर- कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिटयुट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन पंढरपुर संचलित लोटस इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘ऱ्हिदम २ के १९’ चे आयोजन आज शुक्रवार (दि.१२) व उद्या शनिवार (दि. १३ एप्रिल २०१९) रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून त्याचे उदघाटन आज सायंकाळी ५ वाजता उत्साही वातावरणात होणार आहे. यानिमित्ताने शाळेच्या सर्व चिमुकल्या व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विविध रंगांची उधळण होणार असून स्नेहसंमेलन पाहण्यासाठी वेगळीच मजा येणार आहे.
‘लहान मुलांचा सळसळता उत्साह, जल्लोश, कलागुणांची चौफेर उधळण, हिंदी व मराठी चित्रपट गीतांचा सुरेख संगम, मिमिक्री, सर्वधर्मसमभावाची भावना, समाजोपयोगी शिकवण याचा उत्कृष्ठ संगम असलेल्या या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांबरोबरच व्यवस्थापन मंडळ, संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, प्राचार्य, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी सदस्य, विद्यार्थी मंडळ, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.’ अशी माहिती लोटसच्या प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी दिली.


