विद्या बालनला मिळाला डिस्चार्ज

Loading

  • नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि चालू वर्षाला गुडबाय करण्यासाठी सर्वच जण जय्यत तयारी करीत असतात. कोणी कुटुंबासमवेत तर कोणी फ्रेंड्ससोबत. पण प्रत्येकाचाच काही ना काही प्लॅन हा ४-५ दिवस अगोदरच तयार व्हायला लागलेला असतो. अगदी सेलीब्रिटी मंडळीही याला अपवाद नाहीत. मात्र काहींच्या बाबतीत ते घडू शकत नाही. असंच काहीसं झालं आहे भगवानदादांच्या जीवनावर आधारित ‘एक अलबेला’ चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या विद्या बालनसोबत. कारणही तसंच आहे ना, अभिनेत्री विद्या बालन हिला सध्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यामुळे नवीन वर्षाच्या स्वागताच्या सेलीब्रेशनसोबतच तिचा वाढदिवस सेलीब्रेट करण्याचा प्लॅन बदलला होता. विद्या आणि सिद्धार्थ यांनी नववर्षाच्या स्वागताचा आणि १ जानेवारी रोजी असलेला विद्याचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन बनवला होता. यासाठी त्यांनी एका अज्ञात स्थळी जाण्यासाठी तयारीही सुरू केली होती. पण आता तिला डिस्चार्ज मिळाला असल्यामुळे छोट्या प्रमाणात का होईना तिला तिचा बर्थडे आणि नवीन वर्षाची सुरुवात साजरी करता येईल. विद्या आता मराठीत काम केल्यामुळे मराठमोळी मुलगीच झाली आहे.
    त्यामुळे तिच्या मराठी चाहत्यांनीही तिला वाढदिवसासाठी शुभेच्छांसह लवकरात लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना केलीच असणार, त्यामुळेच तिला लवकर डिस्चार्ज मिळाला, असंही म्हणता येईल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *