रविवार दि.3 जानेवारी रोजी पिंपळे सौदागर या कार्यालयात मराठा समाज मंडळाची बैठक संपन्न
झाली. या बैठकीत समाजाच्या वतीने सर्वस्तरातील सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे
सर्वानुमते ठरले. यावेळी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, कॉन्ट्रॅक्टर, व्यापारी वर्ग, पत्रकार, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक, शेतकरी बांधव, युवक वर्ग यांच्यासह सर्व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मराठा समाजातील अनेक ज्येष्ठांनी मार्गदर्शन
केले.
समाजातील एखाद्या गरीब कुटूंबातील विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा खर्च समाजाच्या वतीने करण्यात येणार असून शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी आयोजक स्वागत (दादा) कदम, गोपी वाडदेकर, जगदीश पवार, अमोल आटकळे यांच्यांकडून समाजातील काही बांधवांना संपर्क साधता आला नाही त्याबद्दल त्यांनी दिलगीर व्यक्त केली व यापुढे आयोजित करण्यात येणार्या बैठकीला सर्वांना बोलाविण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर आभार व्यक्त करत बैठक संपन्न झाली.