👁 6 Views

मंगळवेढा: 26 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथे एका ट्रकमधून 26 लाखांच्या मुद्देमालासह गुटखा जप्त करण्यात आला असून, तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिह्यात प्रतिबंध गुटख्याची सर्रास विक्री सुरू आहे.


कर्नाटकातून मंगळवेढा मार्गे लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणला जातो. त्यामुळे मंगळवेढा तालुका म्हणजे कर्नाटकातून येणाऱया गुटख्याचे महाप्रवेशद्वार ठरल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

बाजीराव विष्णू बाबर (रा. आलेगाव, सांगोला), दिलीप रामचंद्र मस्के (मस्के कॉलनी, सांगोला), श्रीशैल ऊर्फ अप्पू कलमनी (रा. चडचण, जि. विजयपूर, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.


कर्नाटकातून प्रतिबंधित गुटखा मोठय़ा प्रमाणावर येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सापळा रचून मंगळवेढा तालुक्यातील महमदाबाद येथे संशयावरून अशोक लेलॅण्ड कंपनीचे वाहन ताब्यात घेण्यात आले. तपासात या वाहनामध्ये विमल पान, व्ही-1, सुपर पानमसाला, नचमत, आरएमडी पान मसाला, एम. सेंटेट, कंपनीचे प्रतिबंधित 17 लाख 32 हजार 200 रुपयांचा गुटखा आढळला.

पोलिसांनी या गुटख्यासह वाहन असा 26 लाख 32 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेडकॉन्स्टेबल महेश कोळी तपास करीत आहेत.


पंधरा दिवसांतील दुसरी कारवाई

z 15 दिवसांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील मौजे मरवडे येथे पोलिसांनी पिकअप गाडीसह 23 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुटखाही चडचण येथील होता. विजयपूर जिह्यातील चडचण येथून महाराष्ट्रात विशेषकरून सीमाभागात मोठय़ा प्रमाणावर गुटख्याची तस्करी सुरू असल्याचे या दोन कारवायांवरून दिसून येत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *