👁 5 Views

सोलापूर: एसटी स्थानकात आढळला मृतदेह

 

सोलापूर , 18 फेब्रुवारी (हिं.स.) : एसटी स्थानक परीसरातील डीसी बंगल्याजवळील कचरा कुंडीत एक इसम (वय अंदाजे ४० ते ४५) आढळून आला. 


त्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.


एसटी स्थानक परिसरातील विभाग नियंत्रक यांच्या बंगल्याच्या परिसरात एक अज्ञात इसम बेशुध्दावस्थेत पडल्याचे काही प्रवाशांना दिसून आले. 

ही माहिती त्यांनी पोलिसांना दिल्यानंतर फौजदार चावडीचे पोलिस जाधव हे घटनास्थळी दाखल झाले.


 त्यांनी संबंधित इसमाला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *