नेमतवाडी : भोसे (ता. पंढरपूर) येथील जन्मभूमी असलेल्या सद्गुरू संत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व श्रीसंत चरित्र प्रवचनमालेची सांगता पालखी मिरवणूक व काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली.
सात दिवस चालणार्या सप्ताहाचा प्रारंभ जि.प.चे माजी अध्यक्षयशवंतभाऊपाटील यांच्या हस्ते वीणापूजन, ग्रंथपूजन व महापूजा करून करण्यात आली. यावेळी ह.भ.प. उत्तम महाराज बडे (आळंदी), ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, ह.भ.प. बंडातात्या कराडकर (कर्हाड), ह.भ.प. केशव महाराज नामदास, ह.भ.प. महादेव महाराज राऊत (बीड), ह.भ.प. मिलिंद महाराज ढम, ह.भ.प. संदीपान महाराज हासेगावकर, ह.भ.प. एकनाथ महाराज हंडे, ह.भ.प. श्रीगुरू कान्होबा महाराज देहूकर आदींनी कीर्तनाची सेवा बजावली.
यावेळी श्रीसंत देवमामलेदार यशवंतराव महाराज यांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. यासाठी विकास सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, शेखर पाटील, दगडू बनसोडे, यशवंतभाऊपाटील पतसंस्थेचे अध्यक्ष जयवंत गावंधरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्षवैजिनाथ कोरके, सुनील तळेकर, नागनाथ भांडे, रघुनाथ शेटे यांनी परिश्रम घेतले