मंगळवेढय़ात घंटा गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविणार : जगताप

Loading

मंगळवेढा : मंगळवेढा शहर स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी लोकसहभागातून प्रत्येक कुटुंबास दोन डस्टबीन दिल्या जाणार आहेत. शहरातील घंटा गाड्यांना जीपीएस यंत्रणा बसविली जाणार आहे. चांगल्या आरोग्यविषयक सोई सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांनी आरोग्य विषयक तक्रारीबाबत नगरपालिकेच्या टोल फ्री नंबर योजनेचा वापर करण्याचे आवाहन नूतन आरोग्य सभापती अजित जगताप यांनी केले आहे. 
मंगळवेढा नगरपरिषदेने मुख्याधिकारी आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी व लोकसहभागातून शहर हागणदारीमुक्त केले आहे. लोकसहभागातून सार्वजिक शौचालय दुरुस्ती, पाण्याची व विजेची सोय, शौचालय रंगकाम, गटार स्वच्छता, दैनंदिन स्वच्छता चांगल्या पद्धतीने होण्यासाठी प्रयत्न झाले आहेत. याकामी ६ घंटागाड्या अपुर्‍या पडत असून १0 घंटागाड्या सुरु केल्या जाणार आहेत. प्रत्येक घंटा गाडीस जीपीएस कार्यप्रणाली व सायरन बसविला जाणार आहे. शहराचे स्वच्छतेसाठी दोन भागात विभाजन करुन आठ कर्मचार्‍यांची एक टीम अशा दोन टीम तयार केल्या आहेत. याद्वारे गटारी स्वच्छ करुन जंतुनाशक फवारणी, पावडर धुरळणी केली जात आहे. डासांचे प्रमाण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक पंप व एसटीपी पंपाचा वापर सुरू आहे. 
यासाठी नगरपलिकेकडून बँका, पतसंस्था, स्वयंसेवी संस्था, साखर कारखाने, व्यापारी, नोकरदार यांच्याकडे लोकसहभागाची मागणी केली आहे. यास प्रतिसाद मिळत असून बँक ऑफ इंडियाने ४00 डस्टबीन नगरपालिकेस दिल्या असून रतनचंद शहा बँक डस्टबीनसाठी ५0 हजार रुपये देणार आहे. नागरिकांनी आरोग्य विषयक तक्रारीबाबत संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *