जळगावचा विजय चौधरी ठरला डबल ‘महाराष्ट्र केसरी’

Loading

10 जानेवारी : नागपूरमधील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सलग दुसर्‍यांदा जळगावच्या विजय चौधरीने विजय मिळवला आहे. चित्तथरारक लढतीत विजय चौधरीने मुंबईच्या विक्रांत जाधवला 6-3 ने चितपट करत चांदीची गदा पटकावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते विजय चौधरीला चांदीची गदा प्रदान करण्यात आलीये.

कोण होणार महाराष्ट्र केसरी ? या सवालाभोवती सगळ्यांच्या नजरा नागपूरकडे लागल्या होत्या. अखेर आज संध्याकाळी जळगावचा विजय चौधरी आणि मुंबईचा विक्रांत जाधव यांच्यात लढत सुरू झाली. अवघ्या 15 मिनिटं मॅटवर चाललेल्या लढतीत कोण जिंकतय याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. सामन्याची सुरुवात झाल्यानंतर दोन्ही पेहलवान तुल्यबळ वाटत असले तरी आपला आक्रमकपणा आणि अनुभवी डावपेचांच्या जोरावर विजयने मुंबईच्या विक्रांतला चितपट केलं. त्यानंतर एकच जल्लोष झाला. मातीतल्या कुस्तीत तरबेज असणार्‍या विजयने मॅटवरच्या कुस्तीतही हुकुमत असल्याचं दाखवून दिलं. या विजयानंतर या अंतिम सामन्याकरीता खास उपस्थीत असणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चांदीची गदा विजय चौधरीला प्रदान करण्यात आली. ढोल ताश्यांच्या गजरात हा सोहळा पार पडला. आता यापुढे आपलं लक्ष हिंद केसरी आणि ऑलम्पिक हे माझ लक्ष असणार आहे असं विजय चौधरी यांनी सांगितलं.

      अत्यंत चुरशीच्या झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीमध्ये जळगावच्या विजय चौधरीने बाजी मारली आहे. मुंबईच्या विक्रांत जाधववर मात करत महाराष्ट्र केसरीची गदा यंदाही स्वतःकडे राखण्यात विजयला यश आलं आहे.डबल ‘महाराष्ट्र केसरी’ ठरलेला म्हणजेच सलग दोनवेळा महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणारा विजय हा सहावाच पैलवान आहे. विजय चौधरीने विक्रांतचा 6-3 ने पराभव केला.
 दरम्यान महाराष्ट्र केसरीची थेट पोलिस दलात नियुक्ती करण्याची घोषणा अंतिम लढतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्पर्धेवेळी लाल मातीतून कुस्तीचा थरार अनुभवण्यासाठी मुख्यमंत्रीही नागपुरात उपस्थित राहिले होेते.
मॅट विभाग 86 किलो
सुवर्ण – विक्रम शेटे, नगर
रौप्य – अनिरुद्ध पाटील, कोल्हापूर
———————-
माती विभाग 86 किलो
सुवर्ण – दत्ता नरळे, सोलापूर,
रौप्य – नाशिर सय्यद, बीड
कांस्य – हर्षवर्धन थोरात, सांगली
———————-
माती विभाग 70 किलो
सुवर्ण – अशफाक शाहर, औरंगाबाद
रौप्य – विकास बंडगर, सोलापूर
कांस्य – बाबासाहेब डोंबाळे, पुणे जिल्हा

महाराष्ट्र केसरीची थेट पोलीस सेवेत भरती – मुख्यमंत्री दरम्यान, महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्राची शान आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची थेट पोलीस सेवेत भरती केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसंच यापुढे क्रीडा पुरस्कारांना विलंब होणार नाही. राज्य सरकारचे क्रीडा पुरस्कार आता वेळेवर दिले जाईल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं.


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *