करकंब:- पंढरपुर तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या आणि दुष्काळी छायेत असलेल्या करकंब गावची महसुल विभागाने पन्नास टक्के पेक्षा जास्त आणेवारी दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे.करकंब गावाला मागील सहा-सात महीन्या पासून पिण्याचे पाणी मिळने मुश्किलिचे झालेले असताना महसुल कर्मचाऱ्याच्या आणेवारी काढण्याच्या पद्धतीला म्हणावे तरी काय? असा प्रश्न नागरिकांमधुन उपस्थित होत आहे.
करकंब परिसरात झालेली रब्बी पेरणीची आज सर्व पिके जळू लागली आहेत,उभी पिके करपु लागली आहेत.फळबागांना जोपासण्यासाठी टँकरने पाणी घातले जात आहे तरीसुद्धा आज फळबागा जळू लागल्या आहेत.वडयावसत्यावर तर खुपच पाण्याचा तुटवडा आहे.पिण्यासाठी पाणी दोन-तीन किलोमीटर वरुण आणवे लागत आहे.
डाव्या कॅनलला पाणी येऊन दीड वर्ष झाले, बोअरवेलला सुद्धा आज पाणी लागत नाही.शेतकरी दावनीची दूधदुभति जनावरे काडिमोल किमतीला विकत आहे. त्यातच येथील महसुल विभागाने दिलेली आणेवारी शेतकऱ्याची थट्टा करणारीच आहे.
येथील कृषी विभागाने दिलेल्या अहवालात मात्र 80 टक्के पेरणी केलेली पिके जळालेली आहेत असा असला तरी महसुल विभागाने याकडे पूर्ण दुर्लक्ष करुण आपलीच आणेवारी तहसील कार्यालयाकडे पाठवली आहे.
————————

- नरसाप्पा देशमुख (तंटामुक्ति अध्यक्ष,करकंब)
- करकंब मध्ये गेल्या सात-आठ महिन्यापासुन पिण्याचे पाणी मिळेना,पण आज महसुल विभागाने आणेवारी जास्त दाखवून जनतेची दिशाभूल केली आहे.शासनस्तरावर समिति नेमुण दिलेल्या आणेवारीची चौकशी केली जावी.
—–——————–