पंढरीत सारेगमप विजेत्या गायकांच्या भक्तीगीतांचे मंगळवारी आयोजन

पंढरपूर (प्रतिनिधी):- झी मराठी वाहिनी वरील सारेगमप या लोकप्रिय गायन स्पर्धेतील विजेती जोडी मंगळवार दि. 19 जानेवारी 2016 रोजी पंढरीत आपल्या सुमधुर आवाजातील भक्ती गीतांचा व अभंगवाणी चा बहारदार कार्यक्रम सादर करणार आहे.

झी मराठी वाहिनी वरील संगीत क्षेत्रातील लोकप्रिय ठरलेल्या ‘सारेगमप सुर नव्या युगाचे‘ मधील विजेती गायिका सावनी रविंद्र (पुणे) व गायक जयंत पानसरे (सोलापूर)  हे दोघे सेलिब्रेटी आपली भक्तीगीतांची सेवा श्रीविठ्ठल-रुक्मिीणी च्या चरणी अर्पण करण्यासाठी मंगळवारी पंढरीत येत असून त्यांच्या सुमधुर आवाजातील भक्ती गीते व अभंगवाणी श्रवण करण्याची संधी पंढरपूरकरांना लाभणार आहे. येथील तुकाराम भवन येथे संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ही संगीत मैफील रंगणार असून पंढरीतील सर्व संगीत प्रेमी रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन आयोजकांचे वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये तबला साथ पंढरीतील सुशील कुलकर्णी यांची तर हार्मोनियम ची साथ पंढरीतीलच भारत भादुले हे देणार आहेत.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *