पंढरपूर Live वृत्त
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी आज मतदान झाले. एकूण 27033 ऊत्पादक सभासदांपैकी 23926 सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण 88.51% मतदान झाले. संस्था गटातील 60 मतदारांनी राखीव 5 जागांसाठी मतदान केले. या गटातील जागा यापुर्वी बिनविरोध झाली आहे. मतदान शांततेने पार पडले. मतमोजणी मंगळवार दि. 19/1/2016 रोजी पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे होणार आहे.