मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पातील या आहेत तरतुदी

मुंबई – 03 फेब्रुवारी : राज्याची राजधानी  मुंबईच्या महापालिकेनं चालू वर्षाचा 37 हजार 52 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला आहे. आगामी निवडणूक लक्षात घेत पालिकेनं घोषणांचा पाऊस केला.  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा अर्थसंकल्प आज महापालिकेत सादर करण्यात आला. 37 हजार 52 कोटींच्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटीसाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तर बेस्ट उपक्रमासाठी 10 कोटींचं कर्ज महापालिका देणार आहे.


महत्त्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पात भाजपने शिवसेनेवर कुरघोडी केल्याचं चित्र आहे. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक रुपयाचीही तरतूद केलेली नाही. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या योजनांचाच अर्थसंकल्पावर प्रभाव दिसत आहे.

याशिवाय रस्ते विभागाला 3 हजार 863 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नरिमन पॉईंट ते कांदीवलीपर्यंत 33.20 किमी लांबीचा सागरी रस्त्यासाठी महापालिकेने 1 हजार कोटींची तरतूद केली आहे. हँकॉक ब्रीजच्या पुनर्बांधणीसाठी यंदा 10 कोटी तर गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी 130 कोटींची देण्यात येणार आहे.
कचऱ्यापासून गॅस निर्मिती, वीज निर्मिती करणारे प्रकल्प हातात घेतले जाणार आहेत. तसंच देवनार, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमध्ये आवारभिंत, दिवाबत्तीची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ते, सुरक्षेत वाढ इत्यादी सुविधा पुरवण्यात येतील.

 या अर्थसंकल्पात कोण कोणत्या घोषणा केल्या त्याची ही यादी…

मुंबई अर्थसंकल्पातील तरतुदी
– नवीन बेस्ट बसेस खरेदी करण्यासाठी 10 कोटी रु. कर्ज
– गावठाण, कोळीवाडे, आदिवासी पाडे विकास – 27 कोटी तरतूद
– गलिच्छ वस्त्यांच्या सुधारणेसाठी 100 कोटींची विशेष तरतूद
– सार्वजनिक शौचालयांसाठी 75 कोटी रु.
– महामार्गावर महिला शौचालयासाठी 5 कोटी रु.
– गोरेगाव-मुलुंड लिंक रोडसाठी 130 कोटी रु.
– अग्निशमन दल यंत्रसामुग्रीसाठी 246 कोटी रु.
– प्रत्येक विभागात ई-कचरा गोळा करण्यासाठी यंत्रणा उभारणार
– निवासी डॉक्टरांसाठी 3 नवी वसतीगृहं बांधणार
– मागाठाणे येथे थॅलेसेमिया उपचार केंद्रासाठी 4.87 कोटी रु.
– कोस्टल रोड – 12 हजार कोटी
– शहरांमधील रस्त्यांसाठी 2806.80 कोटी
– एलईडी दिव्यांसाठी 10 कोटी
– पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 1408.48 कोटी
– देवनार पशुगृहासाठी 137.95 कोटी
– कचर्‍याबद्दलच्या जनजागृतीसाठी 15 कोटी
– उद्यानांसाठी 523 कोटी
– घनकचरा व्यवस्थापनासाठी 2512.22 कोटी
– जल मलनिस्सारण- 1244 कोटी
– विकास नियोजन खात्यातून- 6284 कोटी मिळण्याचा अंदाज
– महसुली उत्पन्नाचा अंदाज- 25642 कोटी
– महसुली खर्चाचा अंदाज- 25640 कोटी
– गोरेगांव मुलुंड लिंक रोड–130 कोटी
– हँकॉक ब्रिजसाठी 10 कोटी
– पर्जन्य जलवाहिन्यांच्या सुधारणेसाठी 1408 कोटी
– मागाठणे येथे थैलेसेमिया उपचार केंद्राची स्थापना, 4.87 कोटी
– मानवी दुग्ध पेढ़ी प्रस्तावित
– निवासी डॉक्टरांसाठी 3 नविन वसतिगृह बांधली जाणार आहेत, त्यासाठी 5 कोटीची तरतूद 350 कोटीचा एकूण खर्च अपेक्षित
– बेस्टसाठी बसेस खरेदी करण्यासाठी 10 कोटी कर्ज देणार
– गलिच्छ वस्त्यांच्या सुधारणेसाठी 100 कोटीची वेगळी तरतूद
– मुंबईतील अधिकाधिक लोकसंख्या ही चाळी झोपड़पट्टी मध्ये राहते. येणार्‍या निवडणुकांचा विचार करता 9187. 95 कोटी रुपयांची भरघोस तरतूद
– अग्निशमन दलासाठी यंत्रसामग्रीसाठी -246 कोटी
– प्रत्येक विभागात ई कचरा संकलन करण्यासाठी यंत्रणा उभारणार
– स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान 80 कोटी
– सीएसटी स्टेशन सारखी महापालिका इमारतीलाही विद्युत रोषणाई करणार -10 कोटी
– मुलुंड देवनार आणि कांजूर डंम्पिंग ग्राऊंडसाठी 28 कोटीची तरतूद
– डॉ आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीसाठी 1 कोटी
– केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढ़ाओ साठी 10 लाख
– महानगरपालिका पालिकेच्या मुख्यालयावर विद्युत रोषणाईवर 10 कोटी
2394 कोटींचा शिक्षण अर्थ संकल्प
– मिनी सायन्स सेंटरसाठी- 3.5 कोटी
– आरोग्यदायी प्रसाधनासाठी – 10 कोटी
– बालवाडीसाठी टॉय लायब्ररी- 1.76 कोटी
– व्होकेशनल ट्रेनिंग- 1.50 कोटी
– भगिनी शाळा नावाची नवी संकल्पना, दुसर्‍या शाळेतील शिक्षक येऊन शिकवणार
– शाळांच्या हाऊस किपिंगसाठी- 64 कोटी
– राज्य सरकारकडून 1257 कोटी अनुदानाची थकीत रक्कम येणे
– महापालिकेचा अजब न्याय

– महापालिका मुख्यालयाच्या विद्युत रोषणाईसाठी 10 कोटींची तरतूद पण महामार्गांवर महिला शौचालयासाठी फक्त 5 कोटी
– चौपाट्यांवर विद्युत रोषणाईसाठी 20 कोटी रु.
– मुलुंड, देवनार, कांजुरमार्ग डम्पिंग ग्राऊंडसाठी 28 कोटी रु.मुंबई : 

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे
2016-17 साठी मुंबई महापालिकेचे 37052.15 कोटींचं बजेट
स्मार्ट सिटी प्रकल्प- 10 कोटी
बेस्ट उपक्रमासाठी 10 कोटींचं कर्ज महापालिका देणार
पुढील महिन्यापर्यंत इंटरअॅक्टिव्ह एन्टरपिराईज पोर्टल विकसित करण्यात येईल. याद्वारे नागरिकांना ई-गव्हर्नन्सनुसार माहिती, अहवाल, विश्लेषण देण्याची सुविधा असेल. तसंच, नागरिकांना या पोर्टलवर प्रतिक्रियाही नोंदवता येतील. यासाठी ६५ लाखांची तरतूद
ऑनलाईन ट्रेंचिंग- ऑनलाईन परवाना वितरणाची व्यवस्था निर्माण करण्यात येईल.
रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणासाठी 1340 कोटींची तरतूद
रस्ते विभागाला – 3863 कोटी
एलईडी दिव्यांच्या प्रकल्पासाठी – 10 कोटींची तरतूद
नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंत 33.20 किमी लांबीचा सागरी रस्ता
यंदाच्या वर्षी कोस्टल रोडसाठी 1000 कोटींची तरतूद
हँकॉक ब्रीजच्या पुनर्बांधणीसाठी या वर्षीची तरतूद – 10 कोटी
गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्प – 130 कोटी
कच्चा तेलावरची जकात 3% वरुन 4.5 % करणार
जकातीत वाढ झाल्याने मुंबईत पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार
एथेनॉलवरील जकात कर रद्द होणार
पर्जन्य जल वाहिन्यांच्या ब्रिमसिटोवँड प्रकल्पासाठी 765.57 कोटी
थॅलेसिमीया या आजारासाठी मागाठाणे येथे उपचार केंद्राची स्थापना – 4.87 कोटी
मानवी दुग्ध पेढी हा मागील वर्षी तरतूद केलेला प्रकल्प सुरु होणार – राजावाडी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय येथे मानवी दुग्ध पेढी
स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सामूदायिक शौचालयं बांधण्यासाठी 75 कोटींची तरतूद
नवीन शौचालये बांधणार -पे अॅण्ड युजची 1070 आसने असलेली नवीन शौचालयं. 3340 आसनं असलेली नवी सामूदायिक शौचालयं
द्रूतगती महामार्गांलगत महिलांसाठी, तसंच स्वयंचलित शौचालये बांधण्याकरता 5 कोटींची तरतूद
सार्वजनिक कचराकुंड्या काढून टाकण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून येत्या वर्षात 20 ठिकाणी स्टेशनरी कॉम्पॅक्टर्सची खरेदी – 16.50 कोटी
स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत वस्ती स्वच्छता योजना – 32 कोटी
संपूर्ण स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानासाठी – 80.89 कोटी
मेगा वेस्ट प्रोसेसिंग प्रोसेसिंग प्रोजेक्ट – डम्पिंग ग्राऊंडच्या कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी – 28 कोटींची तरतूद. यात कचऱ्यापासून गॅसनिर्मिती,
वीजनिर्मिती करण्याचे प्रकल्प हातात घेतले जाणार
देवनार, मुलुंड डम्पिंग ग्राऊंडमध्ये आवारभिंत, दिवाबत्तीची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ते, सुरक्षेत वाढ इत्यादी सुविधा पुरवण्यात येतील
समक्रमण शिबिरांची आश्रय योजना – 67.05 कोटी
भांडवली कामाच्या एकूण तरतुदींपैकी 35 टक्के तरतुद घनकचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी प्रकल्पांसाठी राखिव
उद्यानं आणि मैदानांसाठी – 312 कोटी
नवा प्रकल्प- पवई इथे पक्षी उद्यान विकसित करण्यासाठी 100 कोटी (डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान, पवई येथे पक्षी उद्यान विकसित होणार)
मुंबई अग्निशमन दलासाठी – 323 कोटी
देवनार पशुवधगृह – 88 कोटी
चौपाट्यांच्या सुशोभिकरण योजनेसाठी – 20 कोटींची तरतूद, याची सुरुवात जुहू चौपाटीपासून होणार
25 रात्र निवाऱ्यांसाठी- 3 कोटी
पाणीपुरवठ्याच्या गारगाई प्रकल्पासाठी यंदा 40 लाख- पाणीपुरवठ्याच्या गारगाई-पिंजाळ प्रकल्पासाठी एकूण (वरचे पकडून) 80 लाख
जलबोगद्यांसाठी – 40 कोटी
मुंबईकरांना 15 दिवसांत जलजोडणी मिळणार. इझ ऑफ डुईंग बिजनेस अंतर्गत जलजोडणी अर्जाचं सुलभीकरण करण्यात आलं. तसंच ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. अर्जाच्या कामकाजावर 15 दिवसांत निर्णय घेणं बंधनकारक
पवई तलावाच्या सुशोभीकरणासाठी – 5.92 कोटी
सौर विद्युत निर्मितीसाठी – 8 कोटी. भांडुप संकुल येथे होणार सौर विद्युत निर्मिती
मिठी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी – 8.67 कोटी

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *