पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला, मोदींच्या कारवर महिलेनं फेकली कुंडी

नवी दिल्ली – 03 फेब्रुवारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झालाय. मोदींच्या कारवर एका महिलेनं कुंडी फेकण्याचा प्रयत्न केलाय.
pm_modi_car_attack2पंतप्रधान मोदी साऊथ ब्लॉकवरच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना या महिलेनं पंतप्रधानांच्या ताफ्यावर हल्ला केला. आणि कुंडी मोदींच्या कारवर भिरकावली. मोदींच्या सुरक्षारक्षकांनी या महिलेला ताब्यात घेतलं. या महिलेनं का हल्ला केला हे अद्याप कळू शकलं नाहीय. संसदमार्ग पोलीस ठाण्यात या महिलेची चौकशी होत आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *