येथील छावा संघटनेच्या वतीने पंढरपूर पत्रकार संघाचे नुतन अध्यक्ष रामभाऊ सरवदे (संपादक सा.ठिणगी) व उपाध्यक्ष भगवान वानखेडे (संपादक-पंढरपूर लाईव्ह) यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष रामभाऊ सरवदे म्हणाले की, छावा युवा संघटनेचे पंढरपूरमधील कार्य उल्लेखनीय असून विविध सामाजिक उपक्रमामध्ये संघटनेच्या पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांचा सहभाग मोलाचा असतो. उपाध्यक्ष भगवान वानखेडे म्हणाले की, छावा संघटनेच्या प्रत्येक चांगल्या कार्यात पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून महत्वाची भुमिका आजपर्यंत निभावली आहे. यापुढेही छावा च्या समाजोपयोगी उपक्रमास आपली कायम साथ राहील.
यावेळी छावा चे पश्चिम महाराष्ट्र विद्यार्थी आघाडी चे अध्यक्ष दत्ता काळे, शहर संघटक सागर चव्हाण, विद्यार्थी आगाडीचे जिल्हाध्यक्ष विकी झेंड, तालुकाध्यक्ष सागर रणदिवे, समाजसेवक सोपान काका (महाराज) देशमुख, शेखरदादा भोसले, भास्करतात्या जगताप, बंटी वाघ, सिध्दांत कदम, जगदीश पवार, धनंजय लटके, नागेश यादव आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.








