2005 पूर्वीच्या जन्म नोंदीचे दाखले मिळण्याची महर्षी वाल्मिकी विद्यार्थी संघाची मागणी

पंढरपूर –

2005 सालानंतर सर्व जन्मनोंदी संगणकीकृत करण्यात आलेल्या आहेत, असे तहसिल कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. परंतू 2005 अगोदरच्या जन्म झालेल्या लोकांची जन्माची
नोंद कार्यालयात रजिस्टर उपलब्ध नसल्याने त्यांचे जन्म दाखले मिळत नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत 2005 अगोदर जन्म झालेल्या लोकांना जन्म दाखला विविध
कामासाठी आवश्यक आहे.

सदर जन्म दाखला मिळण्यासाठी पूर्वी तहसिल कार्यालयात प्रतिज्ञापत्र दिल्यास जन्म दाखला मिळत होता.
परंतू आता सर्व  प्रक्रिया न्यायप्रविष्ठ झाल्याने सर्व सामान्य नागरिकांना जन्माची नोंद असणारा दाखला
मिळण्यास अडचण येत आहे. त्यामुळे  सदर बाबीमध्ये दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी व
सामान्य नागरिकास न्याय मिळवून द्यावा, तसे न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा
इशारा महर्षी वाल्मिकी संघाचे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष महावीर अभंगराव यांनी नायब तहसिलदार यांना
निवेदनाद्वारे दिलेला आहे.

यावेळी प्रसाद सातपुते, सनी पवार, प्रज्वल परचंडे, सुजीत अभंगराव, प्रसाद रांजूण, साहील अभंगराव
इ.उपस्थित होते.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *