प्रांताधिकारी संजय तेली यांनी प्रसंगावधान दाखविले… आणि पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालयाची जप्ती टळली..!

Loading

पंढरपूर (भगवान वानखेडे):- 

पंढरपूर च्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या जप्तीचे आदेश येथील दिवाणी न्यायालयाने एका केसच्या निकालात दिले… प्रांताधिकारी कार्यालयाच्या जप्ती चे वॉरंट ही निघाले… यानुसार खटल्यातील वादीसह मे.कोर्टाचे लिपीक पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालतील स्थावर जंगम मालमत्ता जप्त करण्यासाठी प्रांतकार्यालयात धडकले… पंढरपूर चे प्रांताधिकारी संजय तेली यांनी सर्व प्रकार माहिती करुन घेतला आणि यावरील उपाययोजनेबाबत ची सुत्रे तात्काळ फिरविली आणि त्यांच्या प्रसंगावधानतेमुळे प्रांताधिकारी कार्यालयाची होणारी जप्ती कांही काळासाठी तरी प्रलंबीत झाली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, मंळवेढा तालुक्यातील मौजे बोराळे  येथील श्रीमती विजया उत्तरेश्‍वर धनवे यांचे मालकीची मौजे बोराळे येथील जमीन शासनाने भुसंपादन केलेली आहे. मात्र भुसंपादनाच्या मोबदल्यापैकी 1,95,002 रु. एवढी रक्कम शासनाने स्पेशल दरबान क्र. 14/6 या कामी जमा केली नसल्यामुळे याबाबत श्रीमती विजया धनवे यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा याबाबतचा न्यायालयीन लढा चालु होता. त्यांचे वकील अ‍ॅड. शिरीष पवार यांनी आपले अशिलाची बाजु न्यायालयासमोर पुराव्यानिशी मांडली.  येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांनी श्रीमती धनवे यांच्या बाजुने निकाल देत जमिनीच्या मोबदल्याच्या रक्कमेच्या वसुलीपोटी येथीलो प्रांताधिकारी कार्यालयाच्या जंगम मालमत्तेच्या जप्तीचे आदेश दिले. त्यानुसार श्रीमती पाटील, अ‍ॅड. पवार यांचेसोबत कोर्टाचे बिलीफ डी.व्ही ठाकुर, हे पंढरपूरच्या प्रांताधिकारी कार्यालयात पोहोचले. प्रांताधिकारी संजय तेली यांना याबाबतची सविस्तर माहिती दिली आणि जप्तीची अंमलबजावणी करणेस प्रारंभ केला. मात्र प्रांताधिकारी संजय तेली यांनी वरिष्ठांशी चर्चा करुन तसेच अ‍ॅड. शिरीष पवार व श्रीमती विजया धनवे यांना आज रोजी दि.5 फेब्रुवारी ला आपण करत असलेली जप्ती कारवाई मागे घ्यावी. अशी विनंती केली व तसे पत्र ही त्यांना दिले आणि एक महिन्याचा अवधी मागुन घेतला. त्यानुसार आज होणारी ही जप्ती टळली असून एक महिन्याच्या आत शासन देणे असलेली भुसंपादनाची उर्वरीत रक्कम देऊ अशी ग्वाही प्रांताधिकारी यांनी श्रीमती धनवे यांना दिली आहे.

असे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाहीत  याबाबत काळजी घेऊ-प्रांताधिकारी

याबाबतची मला काहिच माहिती नव्हती. आकस्मीकपणे हे जप्तीचे वॉरंट घेऊन ही मंडळी आली. मात्र सर्व प्रकार लक्षात आल्यास यातील भुसंपादनाची उर्वरीत रक्कम देणेबाबत कार्यालयाकडून श्रीमती धनवे यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असून एक महिन्यामध्ये वरिष्ठांकडे पत्रव्यवहार करुन ही रक्कम मिळवून देणेबाबतचे पत्र त्यांना दिले आहे. या घटनेमुळे भुसंपादनाबाबतचे आणखी कांही केसेस बाकी आहेत का ते पाहून तसे आढळल्यास असे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाहीत याची काळजी घेतली जाईल.  असे मत दै.दामाजी एक्सप्रेसशी बोलताना प्रांताधिकारी संजय तेली  यांनी व्यक्त केले.

शासनाकडे आणखी बर्‍याच लाभार्थ्यांची रक्कम येणे बाकी-अ‍ॅड.डी.व्ही पवार

मंगळवेढा तालुक्यातील अनेकांच्या जमीनींचे भुसंपादन शासनाने केलेले आहे. मात्र अनेकांची या मोबदल्यापोटी असलेली देय  रक्कम शासनाने दिलेलीच नाही. त्यामुळे अशा अनेक केसेस दिसून येतील. प्रशासकीय अधिकार्‍यांनी  याबाबत सजग राहून वेळीच अशा देय रक्कमा देणे अत्यावश्यक आहे. श्रीमती विजया धनवे यांची केस गेल्या कित्येक दिवसापासुन आम्ही लढत आहोत. वारंवार मागणी करुनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणुन दिले यामुळे कोर्टाने हे जप्ती वॉरंट बजावले आहे. प्रांताधिकारी संजय तेली यांच्या विनंती पत्रानुसार त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला असून जर एक महिन्यात ही रक्कम आमचे अशिलास मिळाली नाही तर जप्ती ची कारवाई केली जाईल. अशी माहिती अ‍ॅड. शिरीष पवार यांनी दै.दामाजी एक्सप्रेस शी बोलताना दिली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *