नापास करण्याची धमकी देत शिक्षकाचा विद्यार्थींनीवर बलात्कार

Loading

रायपूर (छत्तीसगड): परीक्षेत नापास करण्याची धमकी देत विद्यार्थींनीवर बलात्कार करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय विद्यार्थींनीवर बलात्कार करणारा शिक्षक प्रवीण बंजारेला (38) अटक करण्यात आली आहे.
पीडित विद्यार्थींनी ही तेथील सरकारी शाळेत शिकत होती. तिथेच प्रवीण हा शिक्षक होता. तिथेच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची शिकवणी घेण्यासाठी तो त्यांच्या घरी जात होता. फेब्रुवारीमध्ये पीडित मुलीच्या घरी गेला. त्यावेळी ती घरात एकटीच होती. त्यावेळेस याच गोष्टीचा फायदा घेत प्रवीणने तिला नापास करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, घडल्या प्रकारानंतर विद्यार्थींनीने आपल्या कुटुंबीयांना याबाबत सांगितलं. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांनी शिक्षक प्रवीणच्या मुसक्या आवळल्या.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *