वखार महामंडळाच्या गोदामात हमालांना आले बुरेदिन निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी आदी मुलभूत सुविधांची मागणी

Loading

। पंढरपूर, प्रतिनिधी
येथे असलेल्या महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात माल चढवण्याचे आणि उतरवण्याचे काम करणार्‍या हमालांसाठी निवारा, शौचालय, पिण्याचे पाणी याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी हमाल पंचायतीच्यावतीने करण्यात आलेली आहे.
पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाची 11 गोदामे आहेत. या गोदामांची माल साठवण क्षमता सुमारे दिड लाख मे.टन इतकी असून दररोज हजारो टन मालाची चढ उतार करण्यात येत असते. या मालाची चढ उतार करण्याकरिता येथे 20 हमाल दररोज काम करीत असतात. मात्र या ठिकाणी असलेल्या हमालांना किमान मुलभूत सुविधाही वखार महामंडळाने उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.
त्यामुळे येथे हमालांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. येथे हमालांसाठी शौचालय, मुतारीची सोय नाही. तसेच विश्रांतीच्या वेळेत हमालांना विसाव्यासाठी, कपडे बदलण्यासाठी तसेच आपले साहित्य ठेवण्याकरिता एखादी खोलीसुद्धा महामंडळाने उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे गोदामामध्येच हमालांना दुपारचा विसावा घ्यावा लागतो आहे. पिण्याचे पाणीसुद्धा येथे पुरेशा प्रमाणात व नियमीतपणे  उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होत असून कायम स्वरूपी पिण्याचे शुद्ध पाणी, चांगला निवारा, शौचालय सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी हमाल मापाडी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी महामंडळाच्या स्थानिक प्रशासनाधिकार्‍यांकडे केलेली आहे. संबंधितांनी यासंदर्भात आम्ही वरिष्ठांकडे कळवले असून लवकरच काही मागण्यांची पुर्तता करण्यात येईल असे आश्‍वासन दिले आहे. 
पिण्याचे पाणीसुद्धा येथे पुरेशा प्रमाणात व नियमीतपणे उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी होत  असून कायम स्वरूपी पिण्याचे शुद्ध पाणी, चांगला निवारा, शौचालय सुविधा उपलब्ध करून द्यावी. रेल्वे विभागाने ज्या पद्धतीने माल धक्यावरील हमालांना सुविधा दिल्यात त्या प्रमाणेच वखार महामंडळांनेही हमाल कामगारांसाठी सुविधा द्याव्यात अन्यथा आंदोलन करावे लागेल. 
 – शिवाजी शिंदे, जिल्हाध्यक्ष, हमाल मापाडी महामंडळ

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *