सोलापूरच्या वसुंधरा कला प्रतिठानने पटकाविला प्रथम क्रमांक
पंढरपूर-विविध कलाकारांच्या सुप्तगुणांना श्री. विठ्ठल अभियांत्रिकीने राज्यस्तरीय पथनाट्याद्वारे व्यासपीठ खुले करुन दिल्यामुळे त्यांच्यामधील कलावंत जागा झाला आणि सांस्कृतिक क्षेत्राला यामुळे आणखीन ऊर्जा मिळाली. खरंच अभियांत्रिकी महाविद्यालयाने या हटके’ राबविलेल्या उपक्रमामुळे मला देखील अभिनयाची अधीक प्रेरणा मिळाली. इंजिनिअरिंगमध्ये केवळ शोधनिबंध, प्रकल्प, पेपर प्रेझेेन्टेशन व संशोधन असे अभियांत्रिकीशी संबंधीत उपक्रम होत असतात हे माहित होते परंतु, या मेसा’च्या माध्यमातून पथनाटयामुळे नव्या अभिनेत्यांना चांगले दिवस येतील. अभियांत्रिकीने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे.’ असे प्रतिपादन रिंगण’कार अभिनेते शाम सावजी यांनी केले.
समाजातील व्यथा व वेदनांना वाचा फोडण्यासाठी आणि अनिट प्रवृत्तीकडून होणारा अन्याय व गळचेपी विरुध्द विद्रोहाचा आवाज बुलंद करण्यासाठी श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल विभागामधील मेसा’च्या (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंटस् असोशिएशन) माध्यामातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये महाराट्रातून तब्बल 29 महाविद्यालयातील संघांनी सहभाग घेवून आपले कलागुण सादर केले. यामध्ये पालवी, न्यु सातारा संकुल,सिध्देश्वर माचणूर,सांगोला, गव्हरमेंट पॉलिटेेक्निक,सोलापूर, पुणे, बारामती, सांगली, हिंगोली, नांदेड, लातूर व कोल्हापूर भागातील संघांनी सामाजिक प्रश्नांवर भाय करणारे विाय निवडले होते. यामध्ये स्त्रीभ्रुण हत्या, स्वच्छता अभियान, पाणी बचाव मोहीम, व्यसनाधिनता,ोतकर्यांच्या आत्महत्या,बालकामगार प्रश्न, शिक्षण संस्कृती याबरोबर अनेक जिव्हाळयाचे व ज्वलंत प्रश्न नाटयाद्वारे सादर केले. यामध्ये परिक्षकांना नंबर काढताना तारेवरची कसरत करावी लागली. या पथनाट्यात प्रथम क्रमांक वसुंधरा कला प्रतिठान सोलापूर ने पटकावला, द्वितिय क्रमांक सोशल इंजिनिअरिंग कोल्हापूर, तृतीय क्रमांक के.बी.पी. महाविद्यालय, पंढरपूर तर उत्तेजनार्थ पारितोिाक नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने पटकावले. या विजेत्यंाना अनुक्रमे रोख रुपये सात हजार, पाच हजार, तीन हजार व एक हजार त्याच बरोबर ट्राफी व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. या पथनाट्याच्या कार्यक्रमात पालवीतील विद्यार्थ्यांंनी स्वच्छता व पाणी बचाव या विायावर सादर केलेल्या नाटयाला विशेा पारितोिाक देवून गौरविण्यात आले. ाौचालयाची सोय, वंदे मातरंम्, नेत्यांचा रंग, तारुण्यभार, अंधश्रध्दा निर्मुलन या व अशा सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थ्यी अत्यंत परिश्रमपुर्वक विाय हाताळत होते. पथनाट्य सादर करताना उपस्थित विद्यार्थी कलावंतांना प्रचंड प्रतिसाद देत होते. परिक्षक म्हणून सोलापूर विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण विभागाचे प्रमुख प्रा. भगवान अधटराव, अभिनेते शाम सावजी, सौ. पद्मा दवे-सावजी यांनी काम पाहिले. अखेर पर्यंत उत्कंठावर्धक राहिलेल्या पथनाटयात अनेकांनी उत्कृठ सादरीकरण केले होते. यावेळी स्पर्धक व संघाची सर्व व्यवस्था उत्तमरित्या केली होती. यावेळी पारितोिाक वितरण प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल,अनिरुध्द बडवे,अमृत कुलकर्णी,प्रायोजकदार,प्रभारी प्राचार्य प्रा.एन.डी.मिसाळ व अधिष्ठाता प्रा.एम.एम.पाटील,मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. पी.एस.कचरे, अधिठाता प्रा.एस.आर.गवळी, मेसा’चे समन्वयक प्रा.बिभिाण दुपडे हेेेे उपस्थित होते.मेसा’चे विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्य देशमुख, विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी निलेश पवार, यांच्यासह सुहास बागल, ओंकार क्षीरसागर, प्रशांत डाके, किरण पाटील व इतर विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. प्रा.यशपाल खेडकर यांनी सुत्रसंचालन करुन आभार मानले.
छायाचित्र:-1.मेसा’च्या माध्यामातून राज्यस्तरीय पथनाटय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याचे उदघाटन करताना अभिनेते ााम सावजी सोबत डावीकडून प्रा. भगवान अधटराव, सौ. पद्मा दवे-सावजी, विभागप्रमुख डॉ.पी.एस.कचरे,समन्वयक प्रा.बिभिाण दुपडे, विद्यार्थी अध्यक्ष अजिंक्य देशमुख, निलेश पवार आदी.2. पथनाटय स्पर्धेतील विविध नाट्छटा.3. प्रथम क्रमांकाचे विजेते वसुंधरा कला प्रतिष्ठान सोलापूरचा संघ.