एका व्यक्तीला महिन्याला जास्तीत जास्त सहाच तिकिटं ऑनलाईन बूक करता येणार… रेल्वेचा मोठा निर्णय

मुंबई : आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन आता एका व्यक्तीला महिन्याला जास्तीत जास्त सहाच तिकिटं ऑनलाईन बूक करता येणार आहेत. रेल्वेच्या तिकीटातील संभाव्य दुरुपयोग टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.
    सध्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन एका लॉगइनवर महिन्याभरात दहा तिकीट ऑनलाईन

आरक्षित करता येत असत. मात्र आता हा आकडा कमी करुन सहावर नेण्यात आला आहे. 15 फेब्रुवारी 2016 पासून हा नियम लागू होईल.

    कुठलाही प्रवासी एका दिवसात सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत जास्तीत जास्त दोन तात्काळ तिकीट बुक करु शकतो. रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणाऱ्या दलालांना रोखण्यासाठी आणि रेल्वे प्रवाशांना चांगल्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी हे पाऊल उचललं आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *