![]()
नवी दिल्ली – थोर देशभक्त नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यासंदर्भातील संवेदनशील माहिती असलेल्या आणखी 25 फाईल्स या महिन्यात प्रसिद्ध करण्याचे संकेत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी दिले आहेत.
प्रत्येक महिन्यामध्ये नेताजींशी संबंधित 25 फाईल्स प्रसिद्ध करण्यात येणार असून या महिन्यात प्रसिद्ध करावयाच्या फाईल्सची यादी तयार झाली आहे, असे शर्मा म्हणाले. गेल्या 23 जानेवारी रोजी नेताजींच्या 119 व्या जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नेताजींशी संबंधित 100 फाईल्स प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यानुसार, आता येत्या 23 फेब्रुवारीला पुढील फाईल्स प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
गेल्या महिन्यात प्रसिइद्ध करण्यात आलेल्या फाईल्समध्ये सुमारे 16,600 ऐतिहासिक कागदपत्रांचा समावेश होता.

