नवी दिल्ली, दि. १४ – हरयाणामधील एका खासगी रुग्णालयात नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेवर लैंगिक जबरदस्ती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
. हरयाणाच्या झांज्जर जिल्ह्यात बहादूरगड येथील खासगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एका २२ वर्षीय महिलेची शुक्रवारी प्रसूती झाली.
शनिवारी सकाळच्यावेळी आरोपी डॉक्टरच्या वेशात महिलेच्या खोलीत आला होता. पीडित महिलेला सुरुवातीला डॉक्टर तपासणी करत आहे असे वाटले. मात्र जेव्हा डॉक्टरचा चुकीचा इरादा लक्षात येताच तिने आक्षेप घेतला. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला. शुक्रवारीच पिडित महिलेने सिझरींग ऑपरेशनव्दारे अर्भकाला जन्म दिला.