पंढरपूर (प्रतिनिधी):- यावर्षी प्रामुख्याने जाणवले की, घराघरातील अबालवृध्दांपासून सर्वच शिवप्रेमींमध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीचे औत्सुक्य लागुन राहिले आहे… प्रत्येकाच्या मनात छत्रपतींच्या या सोहळ्याबाबात कमालीचा उत्साह दाटुन आलेला आहे… संपुर्ण पंढरीत जिथे पहावे तिथे भगवे झेंडे फडकताहेत… खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या अध्यात्मीक नगरीतून शिवशक्क्तीचा अन छत्रपती शिवरायांची जयंती घराघरात साजरी करण्याचा संदेश संपुर्ण महाराष्ट्रभर आणि जगभरात पोहोचण्याचे कार्य येथील शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी प्रामाणिकपणे केले आहे. संभाजी ब्रिगेड, छावा मराठा युवा संघठन, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, भोसले चौक तरुण मंडळ आदींसह विविध संघटना, संस्था आणि सर्वसामान्य पंढरपूरकरांसह तडफदार सजग झालेली तरुणाई शिवमय झालेली आढळत आहे.
पंढरपूर येथे शिवजयंतीनिमित्त मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती गठीत करण्यात आली असून विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्रीत येऊन हा सोहळा अधिक भव्य स्वरुपात करणेसाठी प्रयत्न केले आहेत. ‘मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती’ पंढरपूर यांचे वतीने भव्य व्याख्यानमाला व रक्तदान शिबीर आदींसह विविध सामाजिक उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
गुरुवार दि. 18 फेब्रुवारी 2016 रोजी सायंकाळी 6:30 वा. डॉ.छायाताई महाले यांचे तुकाराम महाराज वैकुंठ गमन भ्रम आणि वास्तव या विषयावरील व्याखानाचे आयोजन केले. होते. यावेळी डॉ.सौ.साधनाताई उगले (महिला काँग्रेस अध्यक्षा) तसेच समाजसेविका व जिजाऊ ब्रिगेड च्या जिल्हाध्यक्ष सौ.सुमनताई पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शुक्रवार दि. 19 फेब्रुवारी 2016 रोजी सकाळी 9 वाजता उद्योगपती समाधान आवताडे व मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळ्याचे अध्यक्ष बंडुकाका शिंदे यांचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी चौकातील अश्वारुढ पुतळ्याचे पुजन करण्यात येणार आहे.
शनिवार दि. 20/2/2016 रोजी सायंकाळी 6:30 वाजता शिवविचारवंत दत्ताभाऊ सोनवणे यांचे छत्रपती शिवरायांचे शिवतंत्र या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले असून यावेळी मर्चंट बँकेचे चेअरमन युवराजदादा पाटील व गर्व्हमेंट कॉन्ट्रॅक्टर नागेश फटे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
रविवार दि. 21/2/2016 रोजी सकाळी 9 वाजता जिजाऊ उद्यान शिवाजी चौक येथे पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांचे शुभहस्ते भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून यावेळी डॉ.सुरज पाचकवडे, डॉ.संदेश पडवळे, डॉ.मंदार सोनवणे, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ.पारस राका, डॉ.पंकज गायकवाड, डॉ.केंचे आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
मंगळवार दि. 23 फेब्रुवारी 2016 रोजी सायंकाळी 5:30 वाजता येथील शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार असून या मिरवणुकीचा प्रारंभ आमदार भारतनाना भालके यांचे शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे असतील.
वरील सर्व कार्यक्रमास शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींनी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे आवाहन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती, पंढरपूरचे अध्यक्ष बंडु (काका) शिंदे, उपाध्यक्ष सागर चव्हाण, सचिव सोपानकाका देशमुख, खजिनदार संतोषकाका पाडोळे व संयोजकांनी केले आहे. सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष स्वागतदादा कदम यांचेसह सर्व शिवप्रेमी घेत आहेत. संभाजी ब्रिगेड, छावा युवक संघटन आदींसह




