उत्तम आरोग्य राखण्यासाठी व्यायाम अत्यंत आवश्यक असतात.पण कोणते व्यायाम करावेत हे हि तितकेच महत्वाचे असते.जी काही मंडळी थोडीफार हेल्थकॉन्शस असते त्यापैकी बरेच जण नियमित चालायला जातात.अगदी एकही दिवस न चुकवता रेग्युलर जातात.चालणे हाच एकमेव व्यायाम सर्वात चांगला असून इतर काही करायची गरजच नाही असा काहीसा त्याचा समज झाला असावा.हीच परिस्तिथी नियमित योगासने करणाऱ्यांची.योगासने जगातला सर्वात चांगला व्यायाम प्रकार आहे.आसनामुळे सर्व शरीराला सुंदर व्यायाम मिळतो .रोज तासभर आसने करावीत,बाकी काहीही केले नाही तरी चालेल अशा संभ्रमतले हे लोक.आणि यानंतर येतात रोज जिमला जाऊन वेटलिफ्टिंग करणारे लोक.छानपैकी मसल बनवून समाजात छाती काढून मिरवणारी हि मंडळी आपल्याच दुनियेत वावरणारी.आता एवढी जबरदस्त बॉडी असल्यावर इतरांचाही त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच.कारण जेवढी बॉडी जास्त तेवढे आपण फिट हा गैरसमज समाजात आधीपासूनच रुळलेला आहे.या सर्वांचे तात्पर्य एवढेच कि जो तो स्वतःला जे पटेल जे आवडेल तो व्यायाम करत सुटलेला आहे.कधी विचार केला आहे का शरीराला काय हवं आहे याचा ? कधी विचार केला आहे का शरीराला कुठल्या व्यायामाची गरज आहे याचा ? नाही ना ? म्हणजे थोडक्यात काय तर आपण शरीरावर व्यायाम थोपतो आहोत.मग अशाने आपण फिट राहू शकू का ?हा स्वतालाच विचारण्याचा प्रश्न आहे.
दुसरे म्हणजे आज सायन्स इतके पुढे गेले आहे तरी आपल्याकडील स्त्रिया अजूनही व्यायामाकडे वाळलेल्या दिसत नाहीत.गमतीचा भाग म्हणजे आपणही व्यायाम केला पाहिजे हे त्यांना कळलेले आहे,पण कोणाची वाट पाहत आहेत तेच समजत नाही.व्यायाम सुरु होतच नाही.बर लहान मोठ्या शाररिक कुरकरी पाचवीला पूजलेल्या असल्याप्रमाणे कायम हे दुखतंय ते दुखतंय रात्रंदिवस चालूच असते.वय विचारलं त ३५ ते ४०.आणि अनुभव होतो वार्धक्याचा.थोडक्यात काय तर सासूबाई ताठ आणि सूनबाई ढिली.थोड्याश्या कामाणेही थकलेली.घरात एकादया दिवशी चार पाहुणे आले तर दुसऱ्या दिवशी आजारपणाच आले पाहिजे अशी हि याची तर्हा.हे वाचून खरे तर चीड येईल पण हे सत्य नाकारता येत नाही.अर्थात हे सर्व कोणी मुद्दाम करत नाही पण हे परिस्थिती का येऊन ठेपाते याची करणे शोधायची वेळ आता आली आहे असे मला वाटते.करणे फार सोपी आहेत.कुठली ती उद्या आपण पाह.आपल्या काही शंका असतील तर मला संपर्क करा.मी आपल्याला आवश्यक ती माहिती देण्यासाठी उत्सुक आहे.


