‘रयत’चे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

अहमदनगर ः येथील रयत प्रतिष्ष्ठानच्या माध्यमातून 1 मे महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने समाजात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या महान, थोर व्यक्तींना रयतरत्न, रयतभूषण, रयत आदर्शयुवा, रयतमित्र, रयतवेध, रयतश्री आदि पुरस्काराने विविध मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती रयत चे सचिव पोपटराव बनकर यांनी दिली.
समाजात उल्लेखनीय कार्य करणारे, सामाजिक समस्या दूर करण्यासाठी सढळ हाताने मदत करणारे, सहकार्य करणारे, रक्तदान शिबिरे घेऊन रक्त संकलनात संयोजक, शेक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, उद्योजक, पत्रकारिता, पर्यावरण आदि क्षेत्रात प्रसिध्दीचा हव्यास न करता त्यागी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणार्‍या स्त्री-पुरुष यांना रयत विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराने गौरविणार असून खालील पत्त्यावर दि. 31 मार्चपर्यंत आपले प्रस्ताव अध्यक्ष- सचिव, रयत प्रतिष्ठान, जनवार्ता कार्यालयाजवळ, सुडके मळा, बालिकाश्रम रोड, सावेडी, अहमदनगर या पत्त्यावर पाठवावेत, असे आवाहन संयोजक समितीने केले आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *