पंढरपूर 21 : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि.मुंबई यांचे वतीने पंढरपूर अर्बन बँकेस शतकोत्तर प्रवासाबद्दल विशेष सन्मानपत्र देवून गौरविणेत आले. स्वातंत्र्यवीर सावरकर पथ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे आयोजित महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या बँकांना प्रतिवर्षी पारितोषिक देवून सन्मानीत करणेत येत असते.
यावर्षी पुरस्कार-2016 या सोहळ्याचे अध्यक्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई यांचे एक्झिक्युटर डायरेक्टर मा.श्री.एन.एस.विश्वनाथन् साहेब, नाबार्डचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर मा.श्री.अमलोरपवनाथन साहेब तसेच नॅफकॅब, नवी दिल्लीचे अध्यक्ष मा.श्री.मुकुंद अभ्यंकर, असोसिएशनचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर आदींचे हस्ते सदर सत्कार सोहळा संपन्न झाला. असोसिएशन तर्फे आमदार मा.श्री.प्रशांतराव परिचारक
यांचे मार्गदर्शनाखाली बँकेचे शतकोत्तर वाटचालीची माहिती सांगत सध्या राबवित असलेल्या कोअर बँकींग प्रणाली नव्या युगाशी, तंत्रज्ञान, आव्हानांशी स्पर्धा करीत पंढरपूर बँक सहकार चळवळीला बळकटी
देणारी व सक्षमतेचा विश्वास निर्माण करणारी असल्याचे सांगून बँकेच्या गौरवशाली वाटचालीस शुभेच्छा
दिल्या.
सदर पुरस्कार स्विकारणेसाठी बँकेचे वतीने व्हाईस चेअरमन श्री.दीपक शेटे, संचालक श्री.मुन्नागीर
गोसावी, श्री.हरिष ताठे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.उमेश विरधे, अधिकारी श्री.राजेश आगावणे, .गणेश हरिदास आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.
