👁 2 Views

आरोग्य संवाद – व्यायाम का करावा?

आरोग्य संवाद – व्यायाम का करावा?




           हा प्रश्न आपण कोणालाही विचारला तर उत्तरे जी मिळतात ती ठरलेली असतात. ती म्हणजे पुढीलप्रमाणे -१ वजन कमी करायचे आहे. २ रक्तदाब वाढला आहे.३ दम्याचा त्रास आहे.४ मधुमेह आहे.५ हार्ट प्रॉब्लेम सुरु झाला आहे.६ सांधेदुखी सुरु झाली आहे.७ पोट फार सुटायला लागल आहे.८ बॉडी बनवायची आहे.९ पोलीस अथवा इतर सरकारी
नोकरीसाठी फिटनेस वाढवायचा आहे. १० अन्न पचत नाही ,गॅस होतो, पोट नीट साफ होत नाही वगैरें.
म्हणजे वरील सर्व उद्दीष्टे पहिली कि एक गोष्ट लक्षात येते कि जो तो आवड असल्यामुळे व्यायाम करत नसून शाररिक समस्या निर्माण झाल्यानंतर कोणाच्यातरी सांगण्यामुळे नाविलाजाणे व्यायाम करू लागला आहे.आता जिथे आवड नाही तिथे हे व्यायाम किती काळ करणार.आज गेले तर उद्या नाही आणि उद्या गेले तर परवा नाही.असा सगळा गोंधळ आहे.मग चांगले आरोग्य कुठून मिळणार.विकार जडायच्या पूर्वीपासून व्यायाम सुरु केला तर विकार लवकर होतच नाहीत, आणि एकदा का झाले कि भल्याभल्याना विकारांवर मात करता आलेली नाही.३०-४० व्या वयात जडलेले विकार पुढे उग्र रूप घेत जातात. एकाचे दोन दोनाचे तीन असे नवीन आजार सुरु होतात.म्हणून व्यायाम आधी पासून करायचे असतात.मी मागच्या एका लेखात म्हटले होते कि लहानपणापासून घरातूनच व्यायामाचे संस्कार व्हायला पाहिजेत.यासाठी पालकांची व्यायामाची आवड इथे चांगली कामाला येते.पण पालकच यात इंटरेस्टेड नसतील तर मात्र काही खरे नाही.
           

थोडक्यात काय तर तहान लागल्यानंतर विहीर खोदणे वेडेपणाचे लक्षण असते.आधीच  केलेल्या उपाय योजना कधीही लाखमोलच्या ठरतात.म्हणून जसे आपण पेसे कमावतो ते उज्वल भविष्यासाठी, पुण्य कमावतो मुक्ती अथवा पुढचा जन्म चांगला मिळवा म्हणून मग शरीर नको का कमवायला भविष्यात निरोगी राहता यावे म्हणून.?
वाचक वर्ग हो आता खरच वेळ आली आहे मनाला थोडं संजवण्याची.बस्स झाला आळस.अहो हि वेळ जर निघून गेली तर पुन्हा कधीच येणार नाही.आज आजूबाजूचे वातावरण पाहिले तर लक्षात येईल कि प्रत्येक घरातून एखाद दुसरा तरी या ना त्या विकाराने पीडित आहे.बाहेरचे कशाला आपल्या घरातलंच घ्या ना, आई, वडील, आजोबा, आज्जी अहो जवळजवळ सर्व वयस्क मंडळी औषधे गोळ्या खाऊन जगतायेत.मग आपण पण त्यांचेच अनुकरण करायचे का ? कि स्वतःवर अशी लवकर वेळ येऊ नये म्हणून आधीपासूनच शरीराला कमावून ठेवायचे. कारण कमावलेल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगली असते.आणि ज्यांची हि जास्त त्यांना शक्यतो विकार शिवत नाहीत.म्हणून परिवारातील प्रत्येक सदस्याने मग ती स्त्री असो वा पुरुष, लहान असो वा वयस्क सर्वांनी आपल्या लाडक्या शरीरासाठी तासभर व्यायामासाठी काढलाच पाहिजे आणि तो हि मनापासून.
तर पुन्हा भेटू पुढच्या लेखात,वजन का व कसे वाढते या विषयासह.तर वाचत राहा, आपल्या आप्तजनांना उत्तम आरोग्यासाठी मोटिव्हेट करत राहा,मला प्रश्न विचारात राहा.धन्यवाद.

शंकानिरसन आणि शिबिरासाठी संपर्क करा.   दत्ता गायकवाड -९६१९३२४०८०.आवश्य भेट द्या, 

www.dattagaikwad.com


महाराष्ट्रातील लोकप्रिय आरोग्य विषयक सल्लागार श्री दत्ता गायकवाड यांचे अभ्यासपुर्ण आरोग्यविषयक लेख दररोज… वाचा फक्त आपल्या पंढरपूर लाईव्ह आणि महाराष्ट्र लाईव्ह न्युज वर…

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *