किशोरवयात व तरुणपणी शाळा कॉलेजच्या दिवसात आपल्या शाररिक हालचाली प्रचंड असतात.या वयात आपला बी यम आर म्हणजेच चयापचयाचा वेग जास्त असतो.खण्यापिण्याकढे लक्ष कमी असते.उठल्यापासून कॉलेजला जायची तयारी, कॉलेजच्या नंतर पुन्हा ट्युशन्स वगैरे मध्ये सकाळपासून संध्याकाळ कधी होते हे कळतच नाही.अनेकजण वेगवेगळ्या खेळामधून भाग घेत असतात.यामुळे साधारण २०-२२ वयापर्यंत शरीर ठीकठाक असते.बऱ्याचदा या वयात व्यायामसारखी एखादी चांगली आवड लागते.(नशीबवान असणारे) आणि शरीर कमावण्याचा प्रयत्न केला जातो.पुढे एकदा शिक्षण संपले कि मग नोकरी अथवा बिझनेस सुरु होतो.सर्व शाररिक हालचाली मंदावत जातात.खेळ अथवा इतर ऍक्टिव्हिटी कमी होतात आणि इथूनच वजन वाढीचा श्रीगणेशा होतो.नकळत किंवा जिभेच्या चवी मूळे तेलकट तुपाचे पदार्थ खाल्ले जातात.घरचे आरोग्यासाठी उत्तम असणारे जेवण थांबते आणि बाहेरचे आरोग्यासाठी फक्त अहीतकारी मात्र फारच चविस्ट पदार्थावर ताव मारला जातो.मित्रांच्या लहानमोठ्या पार्ट्या सुरु होतात.सुरवातीला कधीकधी, मात्र नंतर नेहमीच होणाऱ्या या पार्ट्या बराच काही प्यायला व खायला शिकवतात.तिथे आई वडिलांचा वचक अथवा धाक नसतो, तर मित्रांनी प्रेमाने केलेला आग्रह असतो.यामुळे मन आणि वजन दोन्हीही मोकाट सुटते.त्यातच बऱ्याचदा कामासाठी बाहेरगावी जावे लागते.तिथे तरी घराच्यासारखे जेवण कोण देणार ? कधी नाविलाजाने तर कधी आवडीमुळे प्रमाणापेक्षा जास्त खाल्ले जाते.
यावरून आठवले.आपण सगळेच थोडे जास्तच खात असतो.आपली जेवणाची पद्धत हि काहीशी परंपरिकच राहून गेली आहे.शेकडो वर्षांपासून आपण दिवसातून तीन वेळाच जेवतो.नास्ता दुपारचे व रात्रीचे जेवण.यामुळे किंवा आता पुढच्या जेवणाला फार उशीर आहे म्हणून,आणि बऱ्याचदा म्हणजे जेवण छान झाले आहे असे म्हणत, पोट भरले आहे पण मन भरतच नाही , असे म्हणत कदाचित जास्त खाल्ले जाते.यामुळे पचनाच्या वाटोळे होऊन बसते.अशा कारणामुळे वजन वाढीला जी सुरवात होते ती थांबतच नाही. म्हणजे आपण मनावर घेतले कि सगळे काही सहज शक्य असते पण आपण मनावर घेतच नाही, आणि घेतले तरी फार जास्त काळ त्यावर अमलबजावणी होत नाही.कारण लागलेल्या सवई मोडणे थोडे कठीण जाते.
इथे अजून एक मोठा गैरसमज दूर करावासा वाटतो तो म्हणजे एखादा युवक सुरवातीला सडपातळ असतो तेव्हा इतर महिला “लग्नानंतर बघा कसे वजन वाढते ते “असे म्हणताना आपण अनेकदा ऐकलेले आहे.यात काहीही तथ्य नसते.अहो लग्नापूर्वी आई किंवा बहीण जेवण घालत नाही का ? बाहेरून आलेली नीटशी ओळख नसणारी, त्याला असे काय घालणार आहे जे त्यांच्या आयाबहिणींना जमले नाही ते .

तर लक्षात घ्या, लग्न होता होता २५ ते ३० वय येऊन ठेपले. केवळ चया पचायचा वेग ( BMR ) मंदावल्यामुळे वजन वाढत असते. लग्नानंतर अनेक वर्षांनी स्त्रिया नवर्याला म्हणतात ‘ लग्नाच्या वेळी अंगावर टीचभर तरी मास होते का ? आता कसे गुटगुटीत दिसतात बघा ‘. त्यांच्या आईला कुठे धड जेवण करता येत होते, काहीतरी ढवळून द्यायच्या.(स्त्रिया सुद्धा लग्नानंतरच चांगले बाळसे धरतात हे नाकारून चालणार नाही. यामुळे त्यांनाही हे सर्व नियम लागू होतात.चाळीशी येईपर्यंत जवळजवळ सगळ्यांच चांगल्या गुटगुटीत झालेल्या असतात.(काही अपवाद वगळता)हे आपण सर्वांनी पाहिलेले , ऐकलेले व अनुभवलेले आहे. पण यात काही तथ्य नसते.स्त्रियांनी आवश्य खुश होऊन आपली पाठ थोपटून घ्यावी.पण खरे कारण वेगळेच असते.
अनेकदा लग्नापूर्वी फार गरिबी असते.मोजकेच घर मिळेल ते खावे लागते. नोकरी वगैरे लागल्यावर मुबलक पैसे मिळू लागतात त्यामुळे मग मनासारखे म्हणजे नेहमीच बाहेरचे चीज, पिझ्झा, बर्गर, कोक, केक,आईस्क्रीम, या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन सुरु होते जे वजनवाढीला सहाय्यक ठरते.वजन वाढीची अनेक करणे असतात त्यापैकी महत्वाची जी आहेत ती मी दिल्याप्रमाणे आहेत.

वजन मर्यादेत ठेवण्याचा सोपा उपाय म्हणजे दर महिन्याला एकदा वजन चेक करावे.१-२ वजन वाढले असेल तर लगेच महिन्याभरातच कमी करता येते.मात्र १५-२० किलो वाढले तर मात्र मुस्किल होऊन बसते.आता पुढच्या लेखात पाहू वजन सहजतेने कसे कमी करता येईल.शंकानिरसन आणि आपल्या विभागातून शिबिरासाठी संपर्क करा.